Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजVijay Wadettiwar: "नाराजी दाखवून काही पदरात मिळेल, एवढा विषय आहे"; विजय वडेट्टीवारांनी...

Vijay Wadettiwar: “नाराजी दाखवून काही पदरात मिळेल, एवढा विषय आहे”; विजय वडेट्टीवारांनी पालकमंत्रीपदावरुन शिंदेंना डिवचलं

नागपूर | Nagpur
सगळी परिस्थिती पाहून सरकारला जनता स्थगिती देईल असे वाटायला लागलय. इतके मोठे बहुमत मिळाले, तुम्ही सांगत होता. स्वातंत्र्यानंतर कधीच मिळाले नव्हते. आपसातले मतभेद, भांडण इतकी वाढली आहेत की, सत्तेसाठी, खुर्चीसाठी भांडण. त्यातून पैसा मिळवण्याची स्पर्धा सुरु आहे. अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे गावाला रवाना झाले आहेत. वैयक्तीक कारणासाठी चार दिवस ते दरे गावी रवाना झाल्याचे बोलले जात आहे. मात्र पालकमंत्रिपद वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. या विषयी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी भाष्य करत टीका केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. एकनाथ शिंदे यांची गरज संपली का? कदाचित ते बाजूला व्हावेत अशी भीती आहे. आता उद्धवजींना संपून शिंदेंना आणले आणि आता शिंदेंना संपून नवीन ‘उदय’ पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा परिस्थिती शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्रात येईल.

पालकमंत्री पदाच्या वाटपावरुन एकनाथ शिंदे नाराज आहेत, ते दरेगावला निघून गेलेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर वडेट्टीवार म्हणाले की, “तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करेमना. नाराजी दाखवून काही पदरात मिळेल, एवढा विषय आहे.” असे वडेट्टीवार म्हणाले.

सध्याची ही सगळी परिस्थिती पाहून जनता सरकारला स्थगिती देईल. हा काय सावळा गोंधळ, ड्रामा सुरू आहे. एवढे बहुमत असताना आपसात मतभेद वाढले, सत्तेसाठी पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. शर्मेने मान खाली घालावी, अशी स्पर्धा सुरू आहे. परिणामी “भांडा सौख्यभरे” असे म्हणण्याची वेळ आली आहे. आज पालकमंत्री बदलायची पाळी आली, परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल.. त्यानंतर मुख्यमंत्री बदलायची वेळ येईल. असे ही विजय वडेट्टीवार म्हणाले.

तसेच, ‘उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही. कारण काही उदय दोन्ही डग्यावर हात मारून आहे.’, असे देखील मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...