Tuesday, September 17, 2024
Homeक्राईमअनेकांना चुना लावणारा विकास पाटील अखेर सापडला

अनेकांना चुना लावणारा विकास पाटील अखेर सापडला

चाळीसगांव | मनोहर कांडेकर

- Advertisement -

जानेवारी २०२१ मध्ये चाळीसगांव शहर व तालुक्यातील नागरिकांना करोडो रूपयांना गंडा घालत फसवणूक करून रातोरात कुटुंबियांसह शहरातून पसार झालेला एस.टी.महामंडळातील कंडक्टर विकास पाटील हा तब्बल साडेतीन वर्षांनतंर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. त्याचे विरोधात सुशील सायरचंद जैन याने दिलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसात ४२०/३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात विकास पाटील याने केलेल्या फसवणूकीचे अनेक किस्से पोलिसांसमोर येणार असल्याचे दिसून येते.


विकास पाटील हा एस.टी महामंडळच्या चाळीसगांव आगारात तो कंडक्टर होता त्याच्या डोक्यात श्रीमंत बनण्याची कल्पना शिरली असावी म्हणून त्यांने चाळीसगांव शहरातील भडगांव रोड अभिनव शाळेसमोर मोनाली साडी सेंटर या नावाचे मोठे शोरूम भाडेत्तवर उघडले होते. या शोरूम मध्ये ज्वेलरी व इतर वस्तु विक्रीसाठी ठेवल्या होत्या.
आर्कषक अश्या शोरूमाला बघून अनेकांना विकास पाटील हा मोठा उद्योजक वाटू लागला त्याचा फायदा घेत विकास पाटील याने उच्चभ्रू आणि नोकरदार असलेल्या या परिसरातील नागरिकांशी जवळीक साधत अनेकांकडून उद्योगांच्या नावाखाली वेगवेगळया प्रकारच्या भूलथापा देऊन पैसे उकळले.
काही महिलांनी तर घरातील सोने मोडून देखील विकास पाटील याला पैसे दिले. ज्या एस.टी.महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होता त्या महामंडळातील अनेक वाहक आणि चालकांना देखील त्याने अमिष दाखवत कर्मचार्यांच्या नावाने कर्ज देखील उचल्याच्या चर्चा देखील त्यावेळी झाल्या होत्या.
अश्या सर्वांना चुना लावत विकास पाटील हा जानेवारी २०२१ मध्ये रातोरात दुकानातील सर्व माल आणि लोकांकडून घेतलेले पैसे घेऊन कुटंबियांसह पळून गेला होता त्याचा शोध सर्वत्र सुरू होता.


मात्र काही दिवसांपासून तो चाळीसगांव येथे दिसू लागल्याने ज्यांचे त्याच्याकडे पैसे होते. त्यांनी त्या पैश्यांचा तगदा विकास पाटील याच्या कडे लावला. लोक आता पैसे मागू लागल्याने विकास पाटीलने काल चाळीसगांव शहर पेालिस स्टेशन गाठून आपल्याला गावातील काही लोक पैश्यांसाठी दमबाजी करत असल्याची तक्रार देण्यासाठी आला असता त्याचा हा स्मार्टपणा त्याच्याच अंगलट आला. फसवणूक झाल्यातील पहिला तक्रारदार म्हणून सुशिल सायरचंद जैन यानेच विकास शिवाजी पाटील आणि त्याचा मुलगा अक्षय विकास पाटील या देाघांच्या विरोधात विकास पाटील याने घर विक्रीत सुशिल जैन यांच्याकडून पाच लाख रूपये घेऊन सौदा पावती करून दिल्यानंतरही हे घर सुशिल जैन यांना न देता परस्पर श्वेता सुधीर देसले यांना विक्री केल्याची तक्रार जैन यांनी दाखल केल्यानंतर पोलिसांनी विकास पाटील यास ताब्यात घेतले आहे.


विकास पाटील याने ज्या ज्या नागरिकांची आर्थिक फसवणूक केली, त्याचा आकडा दोन करोड रूपयापेक्षा अधिक असल्याची चर्चा असून फसवूणक झालेल्या नागरिकांनी पोलिसांकडे आपली कैफियत मांडावी म्हणजे पोलिसांना देखील या फसवणूकीच्या प्रकरणात विकास पाटील याच्या विरोधात प्रबळ पुराव्यांचे बळ मिळणार असल्याचे सांगितले जाते.या दाखल गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी आणि त्यांचे सहकारी राकेश पाटील करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या