Wednesday, April 30, 2025
Homeराजकीयनिवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत; शिवसेनेकडून बोचरी टीका

निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत; शिवसेनेकडून बोचरी टीका

मुंबई – महाराष्ट्राचे ठाकरे सरकार स्थिर असून, एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकाट हाकले जात आहे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता, आता ‘विखे पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला अन पडला. काँग्रेसची खाट कुरकुरते की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टूरटूर सुरु आहे, अशा कठोर शब्दात टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचावर करण्यात आली आहे.

तसेच वरचेवर पक्ष बदलण्याची कला विखेंना अवगत आहे आणि आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे कीम नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत आणि निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. अशी बोचरी टीका देखील करण्यात आली आहे.

- Advertisement -

काही दिवसापासून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये एकमेकावर टीका करण्यात येत आहे. आता या वादात शिवसेनेने उडी घेतली आहे. या अग्रलेखाची माहिती शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर देखील दिली आहे. राधाकृष्ण विखे यांच्याकडून काय उत्तर येणार हे पाहणे देखील औचित्याचे ठरेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ३० एप्रिल २०२५ – लोकांची साथ आवश्यक

0
सर्व प्रकारचे प्रदूषण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केला जात असल्याचे सरकारकडून वेळोवेळी सांगितले जाते. तथापि असे प्रयत्न लोकांच्या इच्छाशक्तीशिवाय प्रभावी...