मुंबई l Mumbai
अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी समर्थन केले. त्यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती. त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोलही केले होते. त्यांच्यावर वेगवेगळ्या स्तरांतून टीका व्हायला सुरुवात झाली.
अनेक कलावंतांनी देखील गोखले यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली होती. त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोलही केले होते. त्यांच्यावर वेगवेगळ्या स्तरांतून टीका व्हायला सुरुवात झाली. अनेक कलावंतांनी देखील गोखले यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आज विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आणि आपलं मत मांडलं आहे.
पत्रकार परिषदेत विक्रम गोखले म्हणाले, ‘कंगना रणौत या मुलीने व्यक्त केलेली तिची मतं वैयक्तिक आहेत, माझीही वैयक्तिक आहेत. तिने तसं वक्तव्य केलं याला तिची कारणं आहेत आणि मी त्याला दुजोरा दिला याला माझी वेगळी कारणं आहेत. आमची ओळख नाही, संबंध नाही. तिच्याशी नसली तरी माझी राजकीय अभ्यासाशी ओळख आहे. १८ मे २०१४ चा गार्डियन पेपर वाचा. त्यात जे लिहिलेलं आहे, तेच कंगना बोलली आहे. कंगना काहीच चुकीचं बोलली नाही, हे माझं मत मी बदलणार नाही. माझं भाषण माध्यमांनी पूर्ण दाखवलंच नाही. माध्यमांनी माझ्या भाषणाचा विपर्यास केला. पण मी माझ्या मतांवर ठाम आहे. १८ मे २०१४ ला खऱ्या अर्थाने देशाने जागतिक पटलावर उभं राहायला सुरूवात केली’.
गेल्या दोन ते तीन आठवड्यांपूर्वी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या आर्यनची चर्चा होती. त्याला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं अटक केली. आता तो जामीनावर बाहेर आला आहे. यासगळ्या प्रकरणी बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींनी त्याच्यावर प्रतिक्रियाही दिली होती. विक्रम गोखले यांच्या पंच्याहत्तरीनिमित्तानं त्यांनी आपल्या भाषणामध्ये देशाच्या सद्यस्थितीवर भाष्य केले होते. त्यात त्यांनी कंगनानं देशाच्या स्वातंत्र्याविषीय केलेल्या वक्तव्याचाही समावेश होता. याशिवाय आर्यन खान प्रकरणावर गोखले यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी त्यावेळी आर्यन खानवर टीका केली होती. ते म्हणाले होते, देशावर गोळी खात जो जवान शहीद होतो तो आपल्यासाठी हिरो आहे. आर्यन खान नाही. तसेच शाहरुख खान आपलं काहीही वाकडं करु शकत नाही. अशी प्रतिक्रिया गोखले यांनी दिली होती.
तसेच, भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन. सेना-भाजपने मुख्यमंत्रिपद अडिच वर्षांसाठी वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. होय, सेना भाजपची युती तुटणं ही चूकच आहे, हे स्वत: फडणवीसांनी मान्य केलंय माझ्याशी बोलताना त्यांनीही हे कबुल केलंय असं वक्तव्य विक्रम गोखले यांनी केलं होतं.
राज्यात सेना भाजपची युतीचं सरकार येण्यासाठी मी स्वत: उद्धवजींशी बोलेन अस देखील ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यात महाविकास अघाडीचे सरकार स्थापन होणं हा जनाधाराचा अवमान आहे.आताची सेना ही बाळासाहेबांची नाहीच. हे… आमच्यासारखे लोक सेनेच्या बोटचेप्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे देखील विक्रम गोखले यांनी म्हटलं होतं.