अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विळद (Vilad) ते के. के. रेंजकडे (KK Renge) जाणार्या रस्त्यालगत नारूंडी पाझर तलावाजवळ राहत असलेल्या मेंढपाळांवर (Shepherd) 10 ते 12 दरोडेखोरांनी हल्ला करत दरोडा टाकल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात (Robbers Attack) चार जण जखमी झाले असून महिलांचे सोने (Gold) तसेच रोख रक्कम असा एक लाख 51 हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) पोपट बन्सी होडगर (वय 35 रा. पिंप्री घुमट, विळद ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 10 ते 12 दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री दीडच्या सुमारास आलेल्या 10 ते 12 अज्ञात दरोडेखोरांनी विळद (Vilad) परिसरातील नारूंडी पाझर तलावाजवळ राहत असलेल्या मेंढपाळांवर दरोडा टाकला.
यावेळी मेंढपाळ (Shepherd) व दरोडेखोर यांच्यात झटापट झाली. दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. महिलांच्या गळ्यातील, कानातील सुमारे तीन तोळ्याचे सोने व 70 हजार रूपयांची रोकड नेली. दरोडेखोरांनी एक लाख 51 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. रात्रीच्या सुमारास आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेतली परंतु नागरिकांना पाहून दरोडेखोरांनी पोबारा केला. याची माहिती नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना (MIDC Police) दिली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, हल्ल्यात जखमी (Injured) झालेल्या महिला व पुरूषांना अहिल्यानगर शहरातील खासगी रूग्णातयाल उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लक्ष्मण विठ्ठल सूळ, प्रकाश लक्ष्मण सूळ, शीतल पोपट होडगर आणि सुमन लक्ष्मण सूळ असे चौघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.
एसपींकडून तपासाच्या सुचना
घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना समजताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रभारी उपअधीक्षक अमोल भारती, एलसीबीचे निरीक्षक दिनेश आहेर, एमआयडीसीचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. अधीक्षक घार्गे यांनी एलसीबीसह एमआयडीसी पोलिसांना तपासाच्या सुचना केल्या आहेत. पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू झाला आहे.