Saturday, May 25, 2024
Homeनगरगुहात अबु आझमींना गावबंदी; ग्रामस्थांच्या विरोधामुळे पोलिसांनी संगमनेरातच रोखले

गुहात अबु आझमींना गावबंदी; ग्रामस्थांच्या विरोधामुळे पोलिसांनी संगमनेरातच रोखले

राहरी ( तालुका प्रतिनिधी)

राहुरी तालुक्यातील गुहा गावात पुजाऱ्यास व वारकऱ्यांस झालेल्या मारहाणी प्रकरणानंतर दोन समाजात तेढ निर्माण होऊन हाणामारीची घटना घडली होती. सदर घटनेच्या पार्श्वभुमीवर सपाचे आमदार अबू आजमी येथील कुंटुबाच्या भेटीसाठी काल येणार होते. मात्र, गुहा येथील गावकऱ्यांनी एकत्र येऊन आ. आझमी यांना गावात येणास तीव्र विरोध दर्शविला. आ. अबु आझमी यांना गावात प्रवेश करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

- Advertisement -

दरम्यान, गुहा येथे १३ नोव्हेंबर रोजी सकाळी कानिफनाथ मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना काही समाजकंटकांनी येऊन वारकऱ्यांना भजन करण्यास मज्जाव करून पुजाऱ्यांना मारहाण केली होती. यानंतर दोन समाजाच चांगलीच हाणामारी झाली होती. या घटनेच्या पार्श्वभुमिवर सपाचे आ. अबु आझमी हे काल गुहा गावातील कुंटुबांना भेटण्यासाठी येणार असल्याचे गावकऱ्यांना समजताच गावातील जवळपास पाचशे ते सहाशे गावकऱ्यांनी तरूणांसह नगर-मनमाड महामार्गावरील वेशीजवळ हातात ‘आ. अबू आझमी परत जा’ व घटनेच्या निषेधाचे फलक घेऊन घोषणाबाजी करून त्यांना गावात येणास विरोध दर्शविला.

मात्र, आ. अबू आझमी संगमनेर येथे आल्यानंतर पोलीसांनी त्यांना कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून गुहा गावात जाण्यापासून रोखले व तेथूनच त्यांना विनंती करून माघारी धाडले व गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यामुळे गुहा गावात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गुहा येथे तणावपुर्ण शांतता आहे. आ. आझमी गावात न आल्याने व पोलीसांच्या सतर्कतेमुळे पुढील संघर्ष टळला.

- Advertisment -

ताज्या बातम्या