ओझे | विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) कादवा माळूंगी ते लखमापूर (Kadwa Malungi to Lakhmapur) या रस्त्याचे (Road) काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून चालू झाले आहे. या रस्त्यावर संबधित ठेकेदाराने खडीकरणाचे काम पूर्ण केले असून रस्त्यावर डांबरीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार कादवा माळुगी येथील सरपंच सविता गांगोडे, प्रकाश आहेर, ग्रा. सदस्य ललिता गांगोडे यांनी केली. त्यानंतर प्रत्यक्ष रस्त्याचे डांबरीकरण चालू असताना सरपंच यांच्यासह सदस्यानी पाहणी करून ठेकेदार व पंतप्रधान ग्रामसडक योजना अधिकारी पाटील यांच्या निदर्शनास आणून देऊन सदर रस्त्याचे काम बंद केले आहे.
या रस्त्यावर मोऱ्यांचे काम करताना पाईट टाकून त्यावर माती टाकत खडीकरण करण्यात आले. प्रत्यक्ष येथे सिमेंट तसेच कच यांचा वापर करणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झालेले नाही. त्यामुळे कादवा माळूगी येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे या रस्त्यावर जे डांबरीकरण केले आहे ते हाताने उकारल्यानंतर पूर्ण निघून जात असल्यामुळे या रस्त्याच्या कामाचा (Work) दर्जा निकृष्ट असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे येथील सरपंच सविता गांगोडे यांच्यासह ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सदर रस्त्याचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, या रस्त्याची किंमत तीन कोटी वीस लाख रुपये असल्यामुळे खर्चाच्या स्वरूपात या रस्त्याचे काम होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षानंतर या रस्त्याचे काम रखडलेले होते. मात्र, मागील वर्षी या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आणि उशिरा का होईना कामाला सुरुवात झाली. परंतु, अधिकारी वर्गाने या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच सदर रस्त्याने मोठ्या प्रमाणावर रहदारी असल्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात (Rain) रस्ता खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी रस्त्याचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.