Saturday, July 27, 2024
Homeनगर357 गावांत दूषित पाणी

357 गावांत दूषित पाणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात विविध योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. जलजीवनच्याही योजनांची त्यात भर पडली आहे. मात्र, काही ठिकाणचे पाणी दूषित आढळले आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल 357 गावांतील नमुन्यांचा त्यात समावेश आहे. यात नगर, पारनेर आणि संगमनेर तालुक्यांतील सर्वांधिक गावे आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या भूवैज्ञानिकांतर्फे दर महिन्यांला पाणी नमुने तपासले जातात. गेल्या सात महिन्यांतील गावांतील पाणी नमुने जैविक तपासणी अहवालातील टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसत आहे. सात महिन्यांची दूषित पाणी नमुन्याची टक्केवारी 3.27 आहे तर गेल्या ऑक्टोबरमधील टक्केवारी 2.51 आहे. यात जिल्ह्यातील 35 गावांचा समावेश असून पारनेर, अकोले, राहुरी आणि संगमनेर तालुक्यातील सर्वांधिक गावे आहेत. तर श्रीरामपूर, श्रीगोंदा, राहाता, कोपरगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील एकाही गावाचा समावेश नाही.

ऑक्टोबर महिन्यांत (2023) महिन्यांत 1 हजार 392 पाणी नमुने तपासणी करण्यात आली. त्यात 35 नमुने दूषित आढळून आले. तर गेल्या सात महिन्यांत 10 हजार 942 ठिकाणचे पाणीनमुन्यांची जैविक तपासणी करण्यात आली. त्यात 357 ठिकाणी नमुन्यात दोष आढळला आहे. ज्या ठिकाणी पाणीनमुने दूषित आढळतात. त्या ग्रामपंचायतींना गटविकास अधिकार्‍यांमार्फत उपाययोजना करण्यास सांगितले जाते. उद्भवाजवळ गटार किंवा कारखाने असतील तर तेथील पाणी दूषित आढळते. त्याच ठिकाणचा नमुना दुसर्‍यांदा दूषित आढळल्यास त्याकडे लक्ष पुरविले जाते. दरमहा तपासणी केल्याने दुषित पाणीपुरवठ्यावर उपाययोजना करता येते.

21 पावडर नमुने निकृष्ठ

जिल्ह्यात एप्रिलपासून आतापर्यंत 21 ठिकाणी ब्लिचिंग पावडर नमुने निकृष्ठ आढळून आलेले आहेत. यात कर्जत 1, नगर 5, नेवासा 3, पारनेर 2, पाथर्डी 3, राहुरी 2, संगमनेर 3 आणि शेवगाव 2 यांचा समावेश आहे.

पाणीपुरवठ्याची लाइन फुटली असल्यासही नमुने दुषित येऊ शकतात. त्यावर उपाययोजना केल्यावर तेथील पाणी पिण्यास योग्य होते. उदभवच दुषित असेल तर तो बदलण्यास सुचविले जाते. केमिकल तपासणीही वर्षातून एकदा केली जाते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

- Advertisment -

ताज्या बातम्या