Tuesday, March 11, 2025
Homeनगर934 गावे आणि 163 वॉर्डात 100 टक्के पशुगणना

934 गावे आणि 163 वॉर्डात 100 टक्के पशुगणना

तीन महिन्यांत 60 टक्के गणना पूर्ण, आता उरले अवघे 25 दिवस

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गेल्या 3 महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या 21 व्या पशुगणनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. 31 मार्चपर्यंत ही मुदत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात वेगवेगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करत आतापर्यंत 60 टक्के पशुगणना झालेली आहे. उर्वरित काम पुढील 25 दिवसांत करावे लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात 934 गावे आणि 163 वॉर्ड अशा 1 हजार 97 ठिकाणी असणारे सर्व प्रकारची जनावरांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. दरपाच वर्षांनंतर पशुगणना होते. मागील पशुगणना 2019 (20 वी पशुगणना) मध्ये झाली होती. त्यानुसार जिल्ह्यात 46 लाख, तर राज्यामध्ये एकूण 3 कोटी 30 लाख इतके पशुधन आहे.

- Advertisement -

21 व्या पशुगणनेला 24 नोव्हेंबर 2024 ला प्रारंभ झाला असून, 31 मार्च 2025 पर्यंत ही गणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्यात 365 प्रगणक व 93 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही पशुगणना प्रथमच ऑनलाइन अर्थात पद्वारे करण्यात येत आहे. पशुगणनेमुळे पशुधनाची संख्या निर्धारित होऊन त्यानुसार राज्य सरकारला धोरण आखता येईल. तसेच योजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी याचा फायदा होणार आहे. यात नागरी व ग्रामीण भागात आढळणार्‍या एकूण 16 पशुधन जाती व कुक्कुटादी पक्षी यांची प्रजातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा करण्यात येत आहे. जिल्हा पशुगणना अधिकार्‍यांना पशुगणनेसाठी विकसित मोबाइल अ‍ॅप, वेब आधारित आणि डॅशबोर्ड निरीक्षण याविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे.

एकूण 1323 गावे व नगरपालिकांचे वॉर्ड अशा एकूण 1871 ठिकाणी पशुगणना करायची आहे. आतापर्यंत त्यातील 934 गावे आणि 163 वार्ड या ठिकाणी (60 टक्के) पशुगणना झाली आहे. क्षेत्रफळाच्यादृष्टीने नगर जिल्हा राज्यात सर्वाधिक मोठा आहे. तसेच राज्यात सर्वाधिक पशुधनही जिल्ह्यातच आहे. त्यामुळे उद्दिष्ट गाठण्यात उशीर होत आहे. तरीही वेळेत उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असा विश्वास पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे.

अशी होणार पशुगणना
ग्रामीण भागात 3 हजार व शहरी भागात 4 हजार कुटुंबांमागे एक प्रगणक नेमला आहे. ग्रामीण भागात 290 व शहरी भागात 56 प्रगणक, तर 93 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रगणक मोबाइल पवर घरोघरी जाऊन पशुगणना करणार आहेत.

या पशुधनाची गणना
पशुधन : गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, वराह, गाढवे, घोडे, खेचरे व उंट. कुक्कुट व कुक्कुटादी पक्षी : कोंबड्या, बदके, शहामृग, इमू, हंस, पाळीव कुत्रे, हत्ती व ससे, भटक्या गायी,कुत्रे.

याठिकाणी शंभर टक्के गणना
अकोले 143, जामखेड 78, कर्जत 100, कोपरगाव 59, नगर 91, नेवासा 77, पारनेर 71, पाथर्डी 72, राहाता 64, राहुरी 71, संगमनेर 120, शेवगाव 57, श्रीगोंदा 59 आणि श्रीरामपूर 35 याठिकाणी शंभर टक्के नोंदणी झालेली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Shirdi Crime News: शिर्डी पुन्हा हादरली! मुलानेच केली वडिलांची निर्घृण हत्या

0
शिर्डी | प्रतिनिधी शिर्डी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, मुलानेच वडिलांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून मुलाने वडिलांना लोखंडी पाईपने...