Sunday, May 5, 2024
Homeनंदुरबारतापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar

जिल्हयातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज (Sarangkheda Barrage) मधून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग तापी नदी (Tapi River) पात्रात सोडण्यात आला असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

तापी नदीवरील हतनूर धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरने उघडून एकूण 19 हजार 423 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे 4 दरवाजे 1 मीटने उघडून एकूण 13 हजार 335 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. संभाव्य पुरपरिस्थिती लक्षात घेता नंदुरबार जिल्हयातील सांरगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 4 दरवाजे एक मीटरने उघडून एकूण 14 हजार 255 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 5 दरवाजे 1 मीटने उघडून एकूण 17 हजार 675 क्युसेक्स इतका विसर्ग आज दि. 13 जुलै 2023 रोजी दुपारी 4 वाजता तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता दोन्ही प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे तापी नदी काठावरील गावांतील नागरीकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

तापी नदीपात्रामध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणीही तापीनदी पात्रांमध्ये जाऊ नये. नदीतील पंप सुरक्षित ठिकाणी स्थळी हलविण्यात यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या