Sunday, September 15, 2024
Homeनगरटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यास मुदतवाढ

टंचाई निवारणार्थ कृती आराखड्यास मुदतवाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत अवघ्या 112.20 मिमी मीटर पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसाअभावी 59 गावे आणि 348 वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली असून पावसाने ताण दिल्याने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी टंचाई निवारणार्थ कारवयाच्या उपाययोजनांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

जिल्ह्यात चार वर्षापासून समाधानकार होत असल्याने पिकांसोबत धरण साठ्याची स्थिती समाधानकारक होती. सलग चार वर्षे जिल्हाभरातील प्रमुख धरणांसोबत दक्षिणेतील मध्यम प्रकल्पात चांगला पाणी साठा होता. यासह दमदार पावसामुळे भूजल पातळीत चांगली वाढ झालेली होती. यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांची स्थिती उत्तम होती. यासह उन्हाळी हंगामात शेतकर्‍यांचा पाणी प्रश्न मिटलेला होता. यामुळे जून महिन्यांत प्रशासनाला पहिल्यांदा पाण्याचा टँकर सुरू करावा लागला होता. यंदा सुरूवातीचा पाऊस उशीर होणार असल्याचा अंदाज असल्याने शेतकर्‍यांसह प्रशासन सुस्त होते.

मात्र, जून पाठोपाठ जुलै महिना कोरडा गेला आहे. आता ऑगस्ट महिन्यांचा पहिला पंधारवाडा संपण्याची वेळ आली आहे. अपवाद वगळता जिल्ह्यात दमदार पाऊस नाही. अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पिके जोमात आहेत. त्यांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र, मेघराज कृपा करत नसल्याने सगळ्याचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.

दुसरीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशूधन असून त्यांच्यासाठी हिरव्या चार्‍याचा गंभीर प्रश्न आहे. चारा टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यांत जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यातून चारा वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. दरम्यान, पाऊस नसल्याने टंचाई झळा वाढल्या असून अनेक भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाली आहे. सध्या 59 गावे आणि 348 गावात पाणीटंचाई असल्याने जिल्हाधिकारी सालीमठ यांनी टंचाई निवारणार्थ कारवयाच्या उपायोजनांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या