Monday, May 27, 2024
Homeनाशिकश्री बालाजी मंदिरात ‘श्रीं‘चा विमानोत्सव उत्साहात; रविवारपासून ब्रह्मोत्सवास सुरुवात

श्री बालाजी मंदिरात ‘श्रीं‘चा विमानोत्सव उत्साहात; रविवारपासून ब्रह्मोत्सवास सुरुवात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील कापड बाजार येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मोत्सवाचे (नवरात्रोत्सव) आयोजन करण्यात आले आहे. या ब्रह्मोत्सवामध्ये मंगळवार (दि.१०) रोजी म्हणजेच इंदिरा एकादशीच्या दिवशी सकाळी विमानोत्सव (देवाचा जन्मोत्सव) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

- Advertisement -

या एकादशीच्या दिवशी मूळ पुरुष गणपती महाराजांना श्री व्यंकटेश बालाजींनी तिरुमालामधील ताम्रपर्णी नदीमध्ये मूर्ती स्वरूपात दर्शन दिले आणि एकादशीच्याच दिवशी श्री व्यंकटेश बालाजी श्रीदेवी भुदेवी सहित विमानावर बसून तिरुपतीच्या पर्वतावर अवतरले. म्हणून या सोहळ्याला विमानोत्सव असे म्हटले जाते, अशी आख्यायिका आहे.

श्री व्यंकटेश बालाजी यांची मुख्य मूर्ती ही या दिवशी पुष्पांनी सजवलेल्या झोपळ्यात ठेवली होती. वाजंत्री, ढोल ताशे च्या गजरात श्री बालाजी प्रकट झाले. त्यानंतर श्रींची झोपाळ्यावर विधिवत पूजा झाली. ह्या वेळी गणपती महाराज ह्यांनी रचलेले ‘हरी यावे…..’ या पारंपरिक धावा याचे पठण झाले.

त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला गेला व आरती करून प्रसाद वाटप झाले.यावेळी श्री संतसेवा संघाचे संस्थापक संजय गोडबोले गुरुजी, काळाराम मंदिराचे पुजारी आणि महंत सुधीरदास पुजारी, बी ए पी एसं स्वामीनारायण मंदिराचे अमितभाई पटेल, यांसह आदी मान्यवर या विमानोत्सावास बालाजी मंदिरात उपस्थित होते.

ब्रह्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कोजागरीपर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवाचा नाशिककरांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी ऍडव्होकेट हर्षवर्धन बालाजीवाले यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या