दिल्ली | Delhi
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याचदरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाने हुलकावणी दिलेली कुस्तीगीर विनेश फोगाट आणि कुस्तीगीर बजरंग पुनिया विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.
हे ही वाचा : अकोलेच्या भाजप नगरसेवकावर पोक्सोचा गुन्हा दाखल
काँग्रेसच्या तिकिटावर विनेश हरयाणा विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे. चरखी दादरी, बाढ़डा किंवा जुलाना यापैकी एका मतदारसंघातून विनेश निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत. तर बजरंगला स्टार प्रचारक केले जाण्याची शक्यता आहे. विनेश आणि बजरंग आज काँग्रेसचा झेंडा हाती घेणार आहेत.
हे ही वाचा : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारा जेरबंद
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, राहुल गांधी यांच्या भेटीनंतर विनेश फोगाट व बजरंग पुनिया यांनी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली होती.
हे ही वाचा : पाण्याच्या वादातून खून करणार्या आरोपीला जन्मठेप