Wednesday, November 20, 2024
Homeदेश विदेशविनेश फोगाट प्रकरणात सचिनचा मास्टरस्ट्रोक; म्हणाला, नियमांचा पुनर्विचार…

विनेश फोगाट प्रकरणात सचिनचा मास्टरस्ट्रोक; म्हणाला, नियमांचा पुनर्विचार…

मुंबई | Mumbai
भारताची स्टार कुस्तीपट्टू विनेश फोगाटला फक्त १०० ग्रॅम वजन जास्त ठेवल्यामुळे तिला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. पण विनेशला रौप्यपदक का मिळायला हवे, याचे सर्वात मोठे कारण सचिनने सांगितले आहे. याबाबत सचिन तेंडुलकरने पोस्ट लिहीली आहे.

भारतरत्न सचिन तेंडुलकर याने पोस्टच्या माध्यमातून म्हंटले की, अम्पायर्स कॉलचा विचार करण्याची वेळ आली आहे… प्रत्येक खेळाचे काही नियम ठरलेले असतात आणि ते नियम त्या त्या परिस्थितीच्या संदर्भाने पाहिले जाणे आवश्यक आहे. काही वेळा या नियमांचा पुनर्विचारही करायला हवा. नियमांचे पालन करून विनेश फोगाट अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. पण, फायनलच्या आधी वजनामुळे ती अपात्र झाली. म्हणून तिचे रौप्य पदक हिसकावून घेणे हे अशोभनीय आहे आणि लॉजिक व खेळभावनेच्या विरोधात आहे.

- Advertisement -

सचिन पुढे म्हणाला की, ” विनेशने जर कोणती अनैतिक गोष्ट केली असती आणि तिला अपात्र ठरवले असते, तर ती वेगळी गोष्ट होती. विनेशने उत्तेजक द्रव्याचे तर सेवन केला नाही. जर तसे घडले असते तर तिला कोणतेही पदक दिले नसते आणि तिला अखेरचा क्रमांक देण्यात आला असता, तर ती गोष्ट योग्य होती. विनेश अंतिम फेरीत पोहोचली ती विजय मिळवूनच. विनेशने तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना पराभूत केले आणि त्यामुळेच ती अंतिम फेरीत पोहोचली. त्यामुळ विनेशला रौप्यपदक मिळायला हवे.”

सचिन अजून पुढे म्हणाला की, ” विनेशचे प्रकरण आता क्रीडा लवादाकडे सोपवण्यात आले आहे आणि याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे. विनेश ज्या गोष्टीची हकदार आहे ती गोष्ट तिला मिळायला हवी, यासाठी आपण तिच्यासाठी प्रार्थना करू या आणि चांगलाच निर्णय समोर येईल, अशी आशा करूया.” सचिनने मांडलेला मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. कारण जर विनेशने काही अनैतिक गोष्टी केल्या असत्या तर तिच्यावर अशी कारवाई करणे योग्य होते. पण ती एकामागून एक सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचली आहे. त्यामुळे तिला रौप्यपदक मिळायला हवे. आपण सर्वजण न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहोत. विनेशला ती ज्यासाठी पात्र आहे असा योग्य सन्मान मिळावा, अशी आशा करूया आणि प्रार्थना करूया, असेही सचिनने नमूद केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या