Saturday, July 27, 2024
Homeनगरआगित द्राक्ष बागेचे 8 लाखाचे नुकसान

आगित द्राक्ष बागेचे 8 लाखाचे नुकसान

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

वीज रोहित्राला लागलेल्या आगीमुळे तालुक्यातील पाडळी येथील शेतकरी वसंत रावसाहेब कचरे यांचा द्राक्षाचा बाग जळून सुमारे आठ लाख रुपयांची नुकसान झाल्याची घटना मंगळवारी (दि.14) पहाटे घडली.

- Advertisement -

पाडळी येथे वसंत कचरे यांची पावणे दोन एकरात द्राक्षाची बाग असून ती काढणीसाठी आलेला असताना द्राक्ष बागेजवळ वीज वितरण कंपनीच्या वीज रोहित्रास अचानक आगली. ही आग जवळच असलेल्या द्राक्षाच्या बागेत पसरून द्राक्षाच्या बाग मोठया प्रमाणावर जळाली. त्यामध्ये द्राक्ष बाग, द्राक्षाचे मंडप व सेंद्रिय खत जवळून सुमारे दहा लाखांचे नुकसान या शेतकर्‍याचे झाले आहे.

द्राक्षाच्या बागा वरून जाणार्‍या विजेच्या तारा तुटून द्राक्षाचे झाडे जळाल्याने हे झाडे कायमचे नष्ट झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या अशा गलथान कारभाराने शेतकर्‍यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कचरे यांनी तीन वर्षांपूर्वी द्राक्षाची बाग लावली होती दोन वर्षांपूर्वी पहिले पीक घेऊन सुमारे साडेआठ लाख रुपयांचे उत्पादन त्यातून मिळवले होते.

यंदाचे हे उत्पन्न घेण्याची दुसरे वर्ष होते त्यात असा प्रकार घडल्याने मोठा आर्थिक फटका त्यांना बसला आहे. महसूल विभागाने या घटनेचा पंचनामा केला असून शासनाने तातडीची आर्थिक मदत करून शेतकर्‍याला नुकसान भरपाई देऊन अडचणीतून बाहेर काढावे व येथील असलेले वीज वितरण कंपनीचे विज रोहित्र हलवण्याची मागणी वसंत कचरे व परिसरातील शेतकर्‍यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या