मलकापूर – malkapur
कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभापती पदाच्या अविश्वास ठराव मतदान प्रक्रीये दरम्यान नांदुरा रोडवरील जिल्हा मध्यवर्ती केंद्रीय सहकारी पतसंस्था मलकापुर चे समोर गैरकायद्याची मंडळ जमून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन तसेच संचालकांची गाडी अडवून धक्का बुक्की करून दगडफेक केली तसेच या घटनेत तीन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहे. या प्रकरणी नऊ जणासह 150 ते 200 जणांवर विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभापती पदाच्या अविश्वास ठराव मतदान प्रक्रीये दरम्यान नांदुरा रोडवरील जिल्हा मध्यवर्ती केंद्रीय सहकारी पतसंस्था समोर उपविभागीय दंडाधिकारी मलकापुर यांचे कलम 144 (1) जाफौ प्रमाणे आदेश लागु आहे. तसेच जिल्हाधिकारी बुलडाणा यांचा जमाव बंदी आदेश कलम 37 (1) (3) महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे दि.27 मे चे सकाळी 06/00 वा पासुन ते दि. 10 जून चे 24/00 वा पावेतो संपुर्ण बुलडाणा जिल्हयांत लागु असतांना जिल्हाधिकारी बुलडाणा तसेच उपविभागीय दंडाधिकारी मलकापुर यांचे वर नमुद आदेशांचे उल्लंघन करुन तसेच पोलीसांच्या आदेशाला न जुमानता दि.31मे शुक्रवार रोजी 11 वाजताच्या सुमारास गैरकायदयाची मंडळी जमवुन कृ.उ.बा.समिती संचालक असलेली लक्झरी बस क्र एम.एच. 12 यु.एम 7211 ला शिवचंद्र तायडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा बाजी करुन वाहन अडविले व गाडीवर धक्का बुक्की केली तसेच जिल्हा मध्यवर्ती केंद्रीय सहकारी पतसंस्थाच्या बाजुला असलेल्या बोळीतुन दगडफेक केली. या घटनेत दंगा काबू पथकातील पोलीस कर्मचारी शेख फैजल शेख खलील, सचिन संजय कवळे, प्रकाश भगवान जाधव यांच्या हाता पायाला दगड लागल्याने किरकोळ जखमी झाले.
या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विजय कडू पाटील, अजय पुरूषोत्तम तायडे, केशव गारमोडे, अमोल वामनराव तायडे, चंद्रशेखर रमेश तायडे, शंभू शिवचंद्र तायडे, राजू मधुकर तायडे, सागर मनोज जैस्वाल, राहुल घाटे व अज्ञात इसमावर 150 ते 200 जणांवर अप. नंबर 265/2 कलम 188,341,143, 147, 149 सह कलम 135 मपोका प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास मलकापूर पोलीस करीत आहे.