पारोळा – प्रतिनिधी parola
जळगाव (jalgaon) जिल्ह्यात सध्या धुमाकूळ घालणाऱ्या लंपी स्कीन आजाराने (Lumpy skin disease) थैमान घातले असून यामुळे जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांनी पारोळा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) असलेल्या बैल बाजाराला पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात आल्याचे आदेश 6 सप्टेंबर रोजी केले होते ते पाळले न जाता मागच्या रविवारी अमळनेर (amalner) रस्त्यावरील महेश मॉल समोर असलेल्या रिकाम्या जागेत छुपा बैल बाजार भरवण्यात आला होता तर या रविवारी दिनांक 18 रोजी पारोळा बायपास रस्त्यावरील वंजारी फाट्यावरील मेघा टॉकीज मागे हा अनधिकृत बाजार भरविण्यात आला व त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीस आणले गेले होते.
याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही म्हणून हा छुपा बाजार दलालांच्या माध्यमातून भरविण्यात आला असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात होते तर अमळनेर रस्त्यावरील विजयानंद हॉस्पिटल समोर बकऱ्यांचा बाजार तर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर कोंबड्याचा बाजार भरविण्यात आला होता. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी या अनधिकृत बाजार भरविल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.