धुळे । dhule। प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील रूदाणे चौकी येथे जागेच्या वादावरून युवतीसह दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच युवतीचा (young woman) विनयभंग (molesting) करण्यात आला. याप्रकरणी आठ जणांवर शिंदखेडा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीएचआरच्या 141 बँकांतील 150 खात्यांसह 37 मालमत्तांबाबत सरकारी वकिलांनी दिली मोठी माहिती..
याबाबत 18 वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, रूदाणे चौकी शिवारातील युवतीच्या घराजवळ असलेल्या डोंगरावर नाना महादू भिल, विठ्ठल नाना भिल, राजु नाना भिल, बापु काशिनाथ भिल, सुक्राम पुंडलीक भिल, नरेश रावबा भिल, रामलाल हरी भिल, सोनु भाईदास भिल सर्व (रा. रूदाणे चौकी) याच्यासह आठ जणांनी हाता पावडी घेवून जागेच्या वादातून युवतीसह सनी सोनवणे यास हाताबुक्यांनी मारहाण केली.
भिल याने पावडीने युवतीच्या पायावर व मानेवर मारले. तर सनी सोनवणे यांच्या डोक्यावर व पाठीवर मारून जखमी केले. तसेच नाना भिल, बापु भिल व सुक्राम भिल यांनी युवतीची दोन्ही हात धरून विनयभंग केला. त्यावरून वरील आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि गोरावडे करीत आहेत.
हिवाळ्यात असे करा तुमच्या त्वचेचे रक्षण !