Friday, June 21, 2024
HomeमनोरंजनVIRAL VIDEO : शाळकरी मुलाच्या 'चंद्रा' गाण्यावर नेटकरी फिदा; पाहा व्हिडिओ

VIRAL VIDEO : शाळकरी मुलाच्या ‘चंद्रा’ गाण्यावर नेटकरी फिदा; पाहा व्हिडिओ

करजगाव | Karajgoan

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल झालेली एखादी गोष्ट प्रेक्षकांचे, नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याने अख्ख्या महाराष्ट्राल वेड लावलं आहे.

नेवासा तालुक्यातील करजगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या जयेश खरे चा वर्गात गायलेला चंद्रमुखी या चित्रपटातील चंद्रा हे गाणं गायलं होतं. कोणत्याही वाद्याच्या साथसंगती शिवाय गायलेल गाण्याचा व्हिडिओ शिक्षक कृष्णा राठोड यांनी काढुन शोसल मिडीयावर टाकला. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून या जयेशच सर्वत्र कौतुक होत आहे.

पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचं एक वाक्य आहे, या मातीमध्ये अनेक प्रकारची रत्ने तुम्हाला सापडतील ,फक्त ती माती ढवळण्याची गरज आहे. उदयन गडाख, मनसेच्या फेसबुक पेज सह अनेकांनी सोशल मिडीयावर हा व्हीडिओ टाकत जयेशला शुभेच्छा दिल्या आहे.

जयेश खरे काही महिण्यापुर्वी “मी होणार सुपर स्टार,छोटे उस्ताद ” या कार्यक्रमात त्याने आपल्या आवाजाचा जलवा दाखवत 18व्या फेरी पर्यत पोहचला होता. गायक आदर्श शिंदे,सचिन पिळगांवकर,गायीका वैशाली सामंत यांची वाहवा मिळविली होती. जयेश च्या गाण्याना उत्साहित होऊन गायक आदर्श शिंदे ना सुद्धा जयेश बरोबर गाणे गाण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी तुझ्या रूपाचं चांदण हे गाणे त्याच्याबरोबर  गायले होते. जयेश चे वडिल विश्वास खरे हे मजुरी करून एका खाजगी ऑक्रेस्टामध्ये गायनाचे काम करतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या