मुंबई | Mumbai
घनदाट जंगलात ढोल, नगाऱ्याच्या तालावर नक्षलवादी थिरकतानाचा एक व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, नक्षल्यांचा बालेकिल्ला असलेल्या बस्तर (जि.छत्तीसगड) येथील जंगलातील हा व्हिडिओ असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता, की नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलामध्ये एकमेकांच्या गळ्यात हात घालून ठेका धरला आहे. ते नृत्य करत आहेत. ढोलाच्या ताशावर हे नक्षलवादी नृत्य करत आहेत. नक्षलवाद्यांच्या दलामध्ये नवे सदस्य सहभागी झाल्यानंतर त्यांनी नृत्य करून हा आनंद साजरा केल्याचं या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.
काही महिन्यांपूर्वी बस्तरमध्ये नक्षल्यांनी नवीन दलम सदस्य भरती केले. यात काही युवतींचाही समावेश आहे. नक्षल चळवळीत जोडल्या गेलेले नवे सदस्य ढोल व नगाऱ्याच्या दणदणाटात नृत्य करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या व्हिडिओची पोलिसांनी पडताळणी केली असून त्यात एकही व्यक्ती गडचिरोलीशी संबंधित नाही. मात्र, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.