Monday, May 25, 2026
Homeदेश विदेशपुराच्या पाण्यातून वाट काढत पिता आपल्या लेकरासाठी झाला आधुनिक काळातला वासुदेव, Video...

पुराच्या पाण्यातून वाट काढत पिता आपल्या लेकरासाठी झाला आधुनिक काळातला वासुदेव, Video Viral

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशभरातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाने थैमान घातले असून उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ८० हजारहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.या पावसामुळे ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. गंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे सर्वत्र पाणी साचले आहेत. यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी गेले आहे त्यामुळे कुटुंब आणी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडले आहेत. पुराच्या पाण्यातून वाट काढत सुरक्षित ठिकाणी जात आहेत याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहेत.

आधुनिक भारतातला ‘वासुदेव’
उत्तर प्रदेशमधील पुरातून एक कुटुंब प्रवास करताना दिसत आहे. छातीएवढ्या पाण्यातून दोघं नवरा-बायको मुलाला घेऊन प्रवास करताना दिसत आहे. वडिलांनी आपल्या लहान मुलाला हातात घेऊन प्रवास केला आहे. फक्त हे एकच कुटुंब नव्हे तर अशी अनेक कुटुंब या पुराच्या पाण्यातून जीव वाचवण्यासाठी जीवघेणा प्रवास करत आहे. सध्या या तिघांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला असून अनेकांनी आधुनिक युगातला ‘वासुदेव’ म्हंटले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : पहिल्या दिवशी पाटी कोरीच; आमदाराच्या...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) नामनिर्देशन पत्र विक्री आणि दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी राजकीय...