नवी दिल्ली | कोरोना व्हायरसने देशभरात शिरकाव केला आहे. अनेक स्तरातून सध्या या विषाणूवर मात करण्यासाठी सरकारला मदतीचा ओघ सुरु आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा विरुष्का म्हणजेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची होत आहे.
आज भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर मदतीची घोषणा करत ट्विट केले की, ‘अनुष्का आणि मी पीएम-की फंड आणि मुख्यमंत्री मदत निधी (महाराष्ट्र) यांना मदत करण्याची शपथ घेतो.
‘कोहली म्हणाले, ‘बर्याच लोकांना धडपडताना पाहून खूप दुख झाले. आम्हाला आशा आहे की, आमच्या योगदानामुळे आमच्या सहकारी नागरिकांच्या वेदना कमी होण्यास मदत होईल.’
विरुष्काने केलेल्या मदतीच्या आकड्यांकडे सर्वांचे लक्ष असतानाच याबाबतची कुठलीही आकडेवारी जाहीर केली नाही. विराटच्या आधी भारतीय फलंदाज सुरेश रैनाने 52 लाख रुपयांची मदत केली आहे.
सचिन तेंडुलकर यांनी 50 लाख, पीव्ही सिंधू यांनी 10 लाख दिले. अजिंक्य रहाणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री मदत निधीला 10 लाख रुपये, सौरव गांगुली यांनी गरजूंना 50 लाख, ईशान किशन यांनी 20 लाखांची मदत केली आहे.