Tuesday, November 3, 2026
Homeक्रीडाविराट कोहलीला 5 कोटी देऊन आश्रमात आणलं...; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमावर खळबळजनक आरोप!

विराट कोहलीला 5 कोटी देऊन आश्रमात आणलं…; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमावर खळबळजनक आरोप!

दिल्ली | Delhi

वृंदावनातील प्रसिद्ध संत श्री प्रेमानंदजी महाराज यांच्या आश्रमात साधक रसिक दुलारी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर आता रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

- Advertisement -

या घटनेवरून पेटलेला वाद शमण्याआधीच श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष फलाहारी बाबा (दिनेश शर्मा) यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आश्रमाच्या व्यवहारांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. क्रिकेटपटू विराट कोहलीला तब्बल ५ कोटी रुपये देऊन आश्रमात आणल्याचा आणि महाराजांच्या प्रसिद्धीसाठी राजस्थानच्या एका कंपनीचा वापर केल्याचा खळबळजनक दावा या पत्रात करण्यात आला आहे.

फलाहारी महाराज यांनी दावा केला आहे की, राजस्थानमधील एका कंपनीने ५ कोटी रुपये देऊन विराट कोहलीला आश्रमात आणले होते. त्यानंतर याच कंपनीशी संबंधित काही संशयास्पद व्यक्ती साधूचा वेश परिधान करून आश्रमात दाखल झाल्या आणि सध्या त्या जमिनींच्या खरेदी-विक्रीत (प्रॉपर्टी डीलिंग) सक्रिय आहेत. या व्यक्तींच्या भूमिकांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

फलाहारी बाबा यांनी संत प्रेमानंद महाराजांचा उल्लेख सनातन धर्माचे अत्यंत महत्त्वाचे आणि आदरणीय संत असा केला आहे. मात्र, “महाराजांच्या आजूबाजूला असलेल्या काही स्वार्थी आणि चुकीच्या वृत्तीच्या लोकांमुळे त्यांच्या स्वच्छ प्रतिमेला मोठा धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे महाराजांनी अशा लोकांपासून तातडीने दूर राहावे,” अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच आश्रमातील बिघडती परिस्थिती पाहता सरकारने प्रेमानंद महाराजांना तातडीने ‘Z+’ सुरक्षा द्यावी, अशी मागणीही पत्रात केली आहे.

फलाहारी बाबांनी पत्रात केवळ प्रसिद्धीचेच नव्हे तर आर्थिक अन् गुन्हेगारी स्वरूपाचेही गंभीर आरोप केले आहेत. वृंदावन आणि न्यू बेलवन आश्रम परिसरातील यमुनेच्या पूरक्षेत्रात अधिकाऱ्यांशी संगनमत करून अवैध जमिनींचे व्यवहार सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, आश्रमाशी जोडून किडनी चोरी आणि मुले गायब होण्यासारख्या अत्यंत गंभीर बाबींचा उल्लेख करत या सर्व प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या गंभीर आरोपांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार (FIR) किंवा सरकारी तपास सुरू झाल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे हे सध्या केवळ दावेच मानले जात असून, यावर आश्रम प्रशासनाकडून कोणती अधिकृत प्रतिक्रिया येते का, याकडे संपूर्ण देश आणि भाविकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र पब्लिक रिलीफ सोसायटी’ची स्थापना

0
मुंबई | वृत्तसंस्था राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात बाधित नागरिकांना मदत करण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी अधिक निधी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने...