Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाVirat Kohli चा भीम पराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज, सचिनलाही टाकले...

Virat Kohli चा भीम पराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज, सचिनलाही टाकले मागे

मुंबई | Mumbai

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामना खेळल्या जात आहे. दिल्ली कसोटीत विराट कोहलीने अद्भुत कामगिरी केली आहे. महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली सारखे दिग्गज देखील त्यांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत हा विक्रम करू शकले नाहीत.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली २५००० धावांचा (Virat Kohli 25000 Runs) टप्पा पार करणारा दुसरा भारतीय खेळाडू बनला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ही मोठी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकरनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याच वेळी 50+ ची सरासरी आणि सर्वात जलद २५००० धावा करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.

भारताच्या ‘या’ माजी यष्टीरक्षक-फलंदाजाची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती

वेगवान २५००० धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ५७७ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर यादीत तिसऱ्या स्थानी रिकी पाँटिंग असून त्याने ५८८ डावांमध्ये २५००० धावा केल्या होत्या. तसेच, यादीत चौथ्या स्थानी जॅक कॅलिस असून त्याने ५९४ डावांमध्ये आणि पाचव्या स्थानी असलेल्या कुमार संगकारा याने ६०८ डावांमध्ये वेगवान २५००० धावा केल्या होत्या.

कार्तिक आर्यनला मुंबई पोलिसांचा दणका

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या २६३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने २६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ११३ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. जडेजाने ४२ धावांत ७ विकेट्स घेतल्या. अश्विनने ५९ धावांत ३ विकेट्स मिळवले. ११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ६ धावांवर पहिला धक्का बसला. लोकेश राहुल पुन्हा अपयशी ठरला. लोकेश पुन्हा अपयशी ठरल्याने रोहित शर्माही नाराज झाला.

Shiv Jayanti 2023 : इस्राईलच्या राजदुतांकडून शिवजयंतीच्या अनोख्या शुभेच्छा, ट्विट केला खास VIDEO

दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा सावध खेळ करताना दिसला. दुसरीकडे रोहितने चांगले फटके मारले. ७व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहितने दोन धावसाठी फटका मारला. दुसऱ्या धावेसाठी रोहितने पुजाराला कॉल केला अन् पुजाराही पळाला. पुजारा बाद होऊ नये म्हणून रोहित माघारी फिरला नाही आणि स्वतः रन आऊट झाला. रोहित २० चेंडूंत ३१ धावा करून माघारी परतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या