Sunday, September 27, 2026
Homeक्रीडाविराट कोहलीने दिले निवृत्तीचे संकेत; म्हणाला, "2027 चा विश्वचषक हा..."

विराट कोहलीने दिले निवृत्तीचे संकेत; म्हणाला, “2027 चा विश्वचषक हा…”

मुंबई । Mumbai

भारतीय क्रिकेट संघाला कठीण प्रसंगातून अनेकदा विजयपथावर नेणारा आणि मैदानात आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या क्रिकेट कारकिर्दीबाबत अत्यंत मोठे आणि भावनिक विधान केले आहे.

- Advertisement -

आगामी ‘आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२७’ (ICC ODI World Cup 2027) हा भारतासाठी खेळताना आपला शेवटचा विश्वचषक असेल, असे स्पष्ट संकेत विराटने दिले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली.

दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे यांच्या संयुक्त यजमानपदाखाली रंगणाऱ्या २०२७ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघाने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना विराट म्हणाला, “देशासाठी खेळताना हा माझा शेवटचा विश्वचषक ठरेल, हीच गोष्ट माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. चषक जिंकण्यासाठी मला मैदानावर स्वतःला पूर्णपणे झोकून द्यायचे असून, त्यासाठी लागणारा त्याग आणि कोणतीही मेहनत करण्याची माझी पूर्ण तयारी आहे.” देशाबाहेर जाऊन एकदिवसीय विश्वचषक जिंकणे हे क्रिकेटमधील सर्वात मोठे आणि कठीण आव्हान असते, असेही त्याने नमूद केले.

मुलाखतीदरम्यान विराटने टीम इंडियाचा नवा कर्णधार शुभमन गिल याचे मनापासून कौतुक केले. तो म्हणाला, “शुभमन गिल सध्या एक कर्णधार म्हणून शिकत आहे. ही भूमिका त्याच्यासाठी नवीन असली, तरी भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असणारा योग्य दृष्टिकोन आणि सकारात्मक आक्रमकता त्याच्याकडे आहे. मैदानावर कोणत्या खेळाडूचा वापर कसा आणि कधी करायचा, याची उत्तम समज त्याला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघाला योग्य दिशेने पुढे नेण्याचे स्पिरिट त्याच्यात आहे.”

विराटच्या या विधानानंतर २०२७ च्या विश्वचषकात त्याच्या आणि रोहित शर्माच्या सहभागाबाबत क्रीडाप्रेमींमध्ये असलेली उत्सुकता अधिक वाढली आहे. ‘रन मशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटच्या या अंतिम विश्वचषक मोहिमेकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : कट्टा एमपीचा अन् धमाका नाशिकमध्ये; पन्नास हजारांत...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik मध्य प्रदेशातून बेकायदेशिरपणे गावठी कट्टे (अग्निशस्त्रे) आणून नाशिक व पुणे शहरात (Nashik and Pune City) बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या टोळीचा नाशिक...