नवी दिल्ली | New Delhi
भारतीय क्रिकेट संघातील माजी कर्णधार विरेंद्र सहेवाग आपल्या फटकेबाजीप्रमाणे सोशल मीडियावर तुफान टोलबाजी करत असतात. त्यामुळे त्यांच्या टि्वटची चांगली चर्चा होत असते. कसोटी क्रिकेटमधील अंजिक्यपदाच्या सामन्याबाबत प्रसिद्ध फिरकीपटू शेन वॉर्न यांना सेहवाग यांनी फिरकीसंदर्भात असा काही सल्ला दिला की, त्यांची चर्चा सोशल मीडियावर खूपच होत आहे….
डब्ल्यूटीसी फायनलमध्ये न्यूझीलंडने त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एकाही फिरकीपटूला स्थान दिले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू शेन वॉर्नने सोशल मीडियावर ट्विट करुन याबाबत आश्चर्य व्यक्त केले.
वॉर्नने आपल्या ट्विटमध्ये न्यूझीलंडच्या निर्णयाला धक्कादायक म्हटले आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने कोणत्याही फिरकी गोलंदाजाला संधी दिली नाही हे पाहून मी खूप निराश झालो.
या विकेटवर स्पिन खूप जास्त होईल कारण पिचवर आधीपासूनच पाऊलखुणा आहेत. बाॅल जास्ती स्पिन झाला तर भारतीय संघाला 275 किंवा 300 पेक्षा जास्त धावा करणे कठीण जाईल.
शेन वॉर्नच्या या ट्विटवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. इतकेच नाही तर क्रिकेट चाहत्यांनी शेन वॉर्नने केलेल्या ट्विटची खिल्लीच उडविली. चाहत्यांनी म्हंटले आहे की, पिच कोरडे असेल तरच बाॅल स्पिन होतो. परंतु साऊथॅम्प्टनमध्ये पाऊस पडत आहे, पिचवर ओलावा असल्याने बाॅल स्पिन होणार नाही.
युजर्सच्या टिप्पणीनंतर वीरेंद्र सेहवागनेदेखील वॉर्नच्या ट्विटसंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. वॉर्नच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करताना सेहवागने त्याला म्हंटले आहे की, तू याची फ्रेम कर आणि स्पिन समजून घेण्याचा प्रयत्न कर. सेहवागची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.