Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाWorld Cup मध्ये खेळाडूंच्या जर्सीवर इंडियाऐवजी ‘हे’ नाव असावं; वीरेंद्र सेहवागचं ट्विट...

World Cup मध्ये खेळाडूंच्या जर्सीवर इंडियाऐवजी ‘हे’ नाव असावं; वीरेंद्र सेहवागचं ट्विट चर्चेत

मुंबई | Mumbai

संसदेच्या आगामी विशेष सत्रादरम्यान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार भारताचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आणू शकते. सध्या India VS Bharat या मुद्द्यावर मोठा वादंग माजलाय. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेत आलंय. सेहवागने ट्विट करत बीरीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडे एक मागणी केली आहे.

- Advertisement -

पुढच्याच महिन्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा (ODI WC 2023) खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचं नाव बदललं जावं असं सेहवागने म्हटलं आहे. स्पर्धेत टीम इंडिया ऐवजी भारत या नावाने मैदानात उतरावं असं सेहवागने ट्विट करत मागणी केली आहे. ट्विटमध्ये सेहवागने पुढे म्हटलंय. मला नेहमीच विश्वास आहे की नाव असे असावे की ते आपल्यामध्ये अभिमान जागृत करेल. आपण भारतीय आहोत आणि इंडिया हे नाव ब्रिटिशांनी दिलं आहे. त्यामुळे इंडियाचं नाव बदललं गेलं पाहिजे.

सेहवागने उदाहरणे देताना म्हटले की, १९९६ विश्वचषकात नेदरलँड्स हॉलंडच्या रूपात विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता. जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत २००३ मध्ये खेळलो तेव्हा त्याचे नाव नेदरलँड्स होते आणि आताही ते कायम आहे.”बर्मा यांनी ब्रिटीशांनी म्यानमारला दिलेले नाव बदलले आहे. इतर अनेक देश त्यांच्या मूळ नावांवर परत गेले आहेत. त्यामुळे या वर्ल्डकपमध्ये जेव्हा आपण कोहली, रोहित, बुमराह, जडेजा यांची नावं घेणार, तेव्हा आशा करतो की, आपल्या हृदयात भारत असेल आणि खेळाडूंनी भारत लिहिलेली जर्सी घालावी, अशी मागणी सेहवागने केली आहे.

दरम्यान सेहवागने केलेले ट्वीट अनेकांचे लक्ष वेधताना दिसत आहे. आता देशाचे नाव इंडिया नसून भारत असे होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र सेहवागच्या मागणीने राजकारणही तापताना दिसत आहे. राजकीय नेतेमंडळी आपापली प्रतिक्रिया देत असून विरोधक भाजपावर टीकास्त्र करताना दिसत आहेत. सेहवागच्या मागणीने सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही जुंपली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या