Saturday, May 4, 2024
Homeनाशिकजांबूनपाड्याला अमेरिकन शास्त्रज्ञांचा दौरा

जांबूनपाड्याला अमेरिकन शास्त्रज्ञांचा दौरा

Visit of American scientists to Jamboonpada

हरसूल । वार्ताहर Harsul

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ( Trimbakeshwar Taluka ) खडकओहळ ग्रामपंचायतीच्या ( Khadakohoal Grampanchayat )जांबूनपाड्याला( Jambunpada ) अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी कुटुंबासह भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी मूलभूत समस्या जाणून घेतल्या. मात्र, स्वातंत्र्याच्या काळानंतरही अनेक मूलभूत समस्या सुटलेल्या नसल्याने खंत व्यक्त केली.

खडकओहळ ग्रामपंचायत अंतर्गत येणारा जांबूनपाडा छोटासा पाडा आहे. या पाड्यात शालेय विद्यार्थ्यांसह 189 लोकवस्ती आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या नकाशात विकासापासून दुर्लक्षित पाडा अशी जांबूनपाड्याची वेगळी ओळख आहे. अद्याप पाड्यात जाण्यासाठी कच्चा अथवा पक्क्या स्वरुपातील रस्ता नाही. वाहतूक, आरोग्यसेवा मिळणे तर दूरच परंतु पायी चालणेही अवघड होत आहे. जुनी तीच वहिवाट स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात जैसे थे आहे.

आजही रुग्णांना डोलीचा आधार देत मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. याचा प्रत्यय प्रत्यक्षात परदेशी पाहुण्यांना आला. पाड्यात अनेक मूलभूत समस्यांनी डोके वर काढले आहे. त्यात शिक्षण, आरोग्य, पाणी, दळणवळण आदींचा समावेश आहे. याच दुर्लक्षित पाड्याला अमेरिकेतील शास्त्रज्ञ व प्राध्यापक डॉ. संजय मॅग्गीरवार यांनी भेट देत मूलभूत समस्या जाणून घेतल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातदेखील येथील मूलभूत समस्या सुटलेल्या नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली.

यावेळी आरोग्य विभाग सेवानिवृत्त संचालक डॉ. अर्चना पाटील, अतिरिक्त सेवानिवृत्त संचालक डॉ. सतीश पवार, नाशिक आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, डॉ. आसावरी मॅग्गीरवार, सामाजिक कार्यकर्त्या भारती भोये, निशांत पवार, अवनी पवार, निषाद मॅग्गीरवार, जलमित्र पोपट महाले, अनिल बोरसे, दशरथ भोये, पोलीसपाटील विठ्ठल गावित, ज्ञानेश्वर खुताडे, ढवळू भोंगे, किसन खुताडे, कैलास खुताडे, सीताराम धनगरे, वसंत वड, पिंटी वड, अनुसया किरकिरे, वेणू धनगरे, मीरा खुताडे, सीता खुताडे, लीला गावित रूपाली वड, दर्शना थाळकर, चित्रा धनगरे, सुनीता खुताडे, विमल भोंगे, अहिल्या खुताडे, काशीबाई धनगरे, संजना खुताडे, सुमित्रा भवर, वैशाली धनगरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

जलमित्राचे कौतुक

जलमित्र पोपट महाले यांच्या संकल्पनेतून जांबूनपाड्यात आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधींची प्रतिमापूजन करून विविध जातीच्या वृक्षांचे वृक्षरोपण करण्यात आले. विशेष म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी खेड्याकडे चला, असे म्हटले होते. खेड्याचा विकास तर देशाचा विकास या दिलेल्या संदेशाला उजाळा मिळाला. यामुळे आलेल्या पाहुण्यांनी या संकल्पनेचे विशेष कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या