Saturday, May 25, 2024
Homeजळगावसुनसगावला केंद्रीय जलजीवन मिशन पथकाची भेट

सुनसगावला केंद्रीय जलजीवन मिशन पथकाची भेट

सुनसगाव, Sunsagaon ता. भुसावळ । वार्ताहर

येथे नुकतीच केंद्रीय जलजिवन मिशन सर्वेक्षण टीमच्या Central Aquatic Mission Survey Team पथकाने भेट देऊन सुनसगाव, गोंभी गावांना शुध्द व स्वच्छ पाणी मिळावे आणि पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी पथकाने भेट देऊन पाहणी Survey केली.

- Advertisement -

भुसावळ तालुक्यातील साकेगाव, कंडारी , फुलगाव, अंजनसोंडे, कठोरा या गावांची जलजिवन मिशनसाठी निवड झाली आहे. आता सुनसगाव व गोंभी गावाची सुध्दा पाहणी या पथकाने केली आहे.

आ. संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारची जलजिवन मिशन योजना राबविण्यात येणार असल्याचे या प्रसंगी माजी सभापती मनिषा पाटील व भाजपाचे तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले.

यातील दिल्ली टिमचे प्रमुख अविनाश नारोकर, विशाल डांगे, दीपक पाटील यांचा यावेळी सत्कार सरपंच दीपक सावकारे, ग्रामसेवक संतोष मोरे, सदस्य शामराव मालचे, सुनील कंकरे यांनी केला. यावेळी पथकाला उपसरपंच जागृती पाटील सदस्य चंचल पाटील, ज्योती पाटील यांनी गावातील माहिती दिली.

या योजनेच्या माध्यमातून सुनसगाव व गोंभी गावातील जीर्ण झालेली पाण्याची टाकी जुनी पाईप लाईन तसेच गावांसाठी पाणी फिल्टर मशिन व स्वच्छ पाणीपुरवठा मिळणे असे या योजनेचा उद्देश असल्याचे दिल्ली टिमचे प्रमुख अविनाश नारोकर यांनी यावेळी सांगितले आहे. गावासाठी ही योजना राबविण्यात येणार असल्याने सुनसगाव व गोंभी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या