प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्ला (Siddhartha Shukla) याचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली होती. पण नंतर तो उठलाच नाही. त्याला रूग्णालयात नेले असता, त्याला मृत घोषित करण्यात आले. रूग्णालयाने त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट केले आहे…
१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत (Mumbai) झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. सिद्धार्थने साली टेलिव्हिजन शो ‘बाबुल का आंगन छूटे ना’पासून करिअरला सुरुवात केली होती.
त्याचं शिक्षण सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये झालं. त्याने रचना संसद महाविद्यालयातून इंटेरियर डिझाईन विषयात पदवी घेतली. तो बालिका वधूमध्ये शिव आणि दिल से दिल तकमध्ये पार्थचे पात्र त्याने साकारले.
2014 मध्ये त्याने ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2017 च्या ‘लव्ह यू जिंदगी’ या चित्रपट त्याने भूमिका साकारली. अभिनयासोबत त्याने अनेक शोजचे निवेदनदेखील केले. ‘इंडियाज गॉट टँलेट’ या शोचे भारती सिंगसोबत निवेदन केले होते. ‘सावधान इंडिया’ या शोचं निवेदन त्याने केले आहे.
बिग बॉस १३ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी रिऍलिटी शोचा सिद्धार्थ विजेता होता. बिग बॉसचा सिझन सुरू झाल्यावरच सिद्धार्थ अंतिम फेरीत जाईल, असा विश्वास अनेकांना होता. त्याचे व्यक्तिमत्त्व, त्याच्या चाहत्यांच्या संख्येमुळे तो या शोमध्ये बराच पुढे जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. शहनाझ गिलसोबत (Shahnaz Gill) असलेल्या त्याच्या प्रेमाची चर्चा बिग बॉस सुरु असताना दररोज ट्विटरवर ट्रेंड होत असे.
बिग बॉसच्या तेराव्या पर्वाचा सिद्धार्थ शुक्ला मानकरी ठरला. या पर्वात सिद्धार्थ अनेक कारणांनी चर्चेत राहिला होता. सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सिद्धार्थ बिग बॉसचा विजेता ठरल्याने त्याला ४० लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले होते.