Saturday, July 27, 2024
HomeमनोरंजनVisual Story : 'Money Heist' मधील 'Bella Ciao' या गाण्याबद्दल काही रोचक...

Visual Story : ‘Money Heist’ मधील ‘Bella Ciao’ या गाण्याबद्दल काही रोचक तथ्य

‘मनी हाईस्ट ५’ (Money Heist 5) सीरीज आज चाहत्यांसमोर सादर करण्यात आली आहे. प्रत्येक वेळेप्रमाणे या वेळीही सीरीजमध्ये खूप सस्पेन्स असणार आहे. या क्राईम ड्रामा मालिकेचे चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. मात्र ‘Money Heist’ या सीरीज मधील क्रांतिकारी गाणे ‘बेला चाव’ला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले आहे. आपण जाणून घेऊयात या गाण्याबद्दल रोचक तथ्य.

Bella Ciao हे गाणे इटली मधील एक लोकगीत आहे. खरे तर हे गाणे कोणी लीहले आहे ह्याचा काही पुरावा सापडत नाही पण हे गाणे काही आता लिहले आहे असे नाही खूप जुने इतिहास असलेले हे गाणे आहे. Bella Ciao हा एक इटालियन शब्द आहे ज्याच्या अर्थ goodbye beautiful असा आहे. इटलीच्या ग्रामीण भागात हे गाणे लोकगीत म्हणून गायले जात होते.

- Advertisement -

इटलीमध्ये तांदूळ काढणाऱ्यांना मोंदिनास (mondinas) असे म्हंटले जात होते. तर १९ व्या शतकाच्या शेवटी या तांदूळ काढणाऱ्यांची परिस्थिति खूप नाजूक होती. ह्या तांदळाच्या शेतामध्ये काम करण्यासाठी गरीब स्त्रियांना घेतले जाई ह्या स्त्रियांना mondana women’s असे ही बोलले जात असे. ह्या स्त्रियांची परिस्तिथी खूप नाजूक असायची पण शेतात काम करताना यांना खूप तास काम करावे लागे तसेच बिना चप्पल म्हणजेच उगड्या पायांनी गुडघ्यापर्यंत असलेल्या पाण्यामध्ये काम करावे लागत असे तसेच त्यांची पाठ खूप वेळ वाकलेलीच असे .एवढा त्रास सहन करूनही त्यांना कामाचा मोबदला हा खूप कमी दिला जात असे. त्यावेळी शेतामध्ये काम करताना या ज्या स्त्रिया आहेत त्या हे Bella Ciao गाणे म्हणत असत पण त्यावेळेस जे गाणे होते ते गरिबांचे होते जे की गरिबांची दुर्दशा दाखवणारे होते.

वेळेनुसार ह्या गाण्याच्या शब्दांमधे बदल होत गेला. दुसऱ्या विश्व युद्धाच्या वेळेस इटलीतील Partisan लोकांनी ह्या गाण्यातील शब्द बदलून partisan version तयार केले जे की मोडीनास version पेक्षा वेगळे होते. बेनिटो मुसोलिनी हा इटलीचा पंतप्रधान आणि हुकुमशहा होता. मुसोलिनी फॅसिझम चा पुरस्कर्ता होता इटलीमध्ये फॅसिझम स्थापन करण्यात मुसोलिनी ची महत्वाची भूमिका होती.हा मुसोलिनी जर्मनीचा हुकुमशहा हिटलर चा मित्र ही होता. १९३९ ला जेव्हा हिटलरने दुसरे विश्व युद्ध पुकारले तेव्हा मुसोलिनी ने जर्मनीला आपला म्हणजेच इटलीचा पाठिंबा दिला होता. इटलीमधील खूप लोकांना हा मुसोलिनीचा निर्णय पसंत नव्हता.

पण जेव्हा १९४३ मध्ये जेव्हा इटली आणि जर्मनी दोन्ही कमजोर पडू लागले तेव्हा इटलीचा त्यावेळचा राजाने मुसोलिनीला अटक केली आणि त्यांचे (इटलीचे) शत्रू म्हणजेच अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांच्याकडे शरणागतीचा प्रस्ताव ठेवला. पण जेव्हा हिटलरला समजले की मुसोलिनी ला अटक केली आहे तेव्हा हिटलरने इटली वर हमला केला आणि इटलीचा खूप प्रदेश जिंकून घेतला. इटलीचे जे लोक हिटलरच्या ह्या हल्यामुळे नाराज होते त्यांनी Italian resistance movement सुरुवात केली त्या लोकांना partisan असे म्हंटले जायचे. १९४३ ते १९४५ पर्यंत Bella Ciao हे गाणे Partisan लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होते पण हे पहिल्यापेक्षा वेगळे होते. हे गाणे स्वातंत्र्यासाठीचे होते. आता जे Money Heist वेब सीरिज मध्ये आहे ते हेच आवृत्ती आहे.

पण हळू हळू हे गाणे एवढे प्रसिद्ध झाले की फक्त इटलीमध्येच नाही तर दुसऱ्या देशांमध्ये सुध्दा हे गाणे वापरू लागले. अन्यायाविरोधात लढणाऱ्यचे तसेच बदल पाहिजे असणाऱ्या लोकांचे हे गाणे आवडीचे बनले. दुसऱ्या विश्व युद्ध नंतर हे गाणे इटलीचा ब्रॅण्डिंग साठीही वापरले गेले. इटलीतील खूप फुटबॉल क्लबचे bella ciao हे गाणे anthem महणून वापरले आहे. यूट्यूब वर तर या गाण्यचे खूप version भेटतील तसेच दुसऱ्या भाषेतही हे गाणे आहे. करोना व्हायरस मुळे जेव्हा लॉकडाऊन् झाले तेव्हा जसे आपण ताटे,वाट्या वाजवल्या तसेच इटली आणि यूरोप मधील लोकांनी घरच्या बाल्कनीतून Bella Ciao गाणे गायले. शेतकऱ्यांनी जेव्हा दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केले त्यावेळेस युट्यूबवर खूप व्हिडिओ मध्ये शेतकऱ्यांचा व्हीडिओ आणि बॅकग्राऊंड ला Bella Ciao हे गाणे असे खूप व्हिडिओ आहेत. तर पंजाबी मध्ये ही Bella Ciao गाणे शेतकरी आंदोलनंवर बनवण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या