कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार्या विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्याशी संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांच्या धाडी (Government Department Raid) पडल्याची माहिती असून 3 जून पासून आत्तपर्यंत तीन वेळा शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विविध प्रकारचे धाडसत्र सुरू आहे. विविध शासकीय पथके कोपरगावात (Kopargav) येऊन कोल्हे यांच्याबाबत चौकशी करत असल्याने जनसामान्यांत चर्चा सुरू झाली आहे. विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून (Nashik Teacher Constituency) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उमेदवारी मागे घेण्यासाठी हे दबावतंत्र सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर (Sahakar Maharshi Shankarao Kolhe Cooperative Sugar Factory) विविध शासकिय विभागांच्या पथकांनी छापे (Government Department Raid) मारले आहेत. अधिकारी विविध कागदपत्रे तपासणी असून संस्थेच्या अधिकार्यांची देखील पथकाकडून चौकशी सुरू आहे. गत 14 तासांपासून कारखान्यातील विविध अधिकार्यांची चौकशी होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. अनेक वेळा कारवाईसाठी दाखल झालेल्या शासनाच्या पथकांकडून अत्यंत गोपनीयता पाळली जात आहे.
सध्या तरी काहीही अनियमितता आढळली नसल्याची माहिती असून पुढे काय माहिती समोर येते याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहे. शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. विवेक कोल्हे हे कोपरगाव (Kopargav) येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहे.
शासनाच्या विविध विभागांकडून कोल्हे यांच्या संस्थांवर धाडी
छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर येथील पथकाने आत्तापर्यंत चौकशी केल्याची माहिती असून 3 जूनपासून आजपर्यंत तिसर्यांदा चौकशी होत असून अद्याप काही गैर प्रकार आढळले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. शासनाचे अधिकारी प्रसारमाध्यमांसमोर कधी माहिती देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.