Friday, September 11, 2026
HomeनाशिकNashik Rain News: पालघरवर घोंघावणारा भोवरा वेगळ्या दिशेने सरकला, नाशिकवरील ढगफुटीचं संकट...

Nashik Rain News: पालघरवर घोंघावणारा भोवरा वेगळ्या दिशेने सरकला, नाशिकवरील ढगफुटीचं संकट टळलं, जिल्हा प्रशासनाची महत्वाची माहिती

नाशिक | Nashik
नाशिकमध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नाशिकला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर, नाशिकमध्ये ढगफुटीसदृष्य पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता नाशिककरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरावर घोंगावणारे अतिवृष्टीचे आणि ढगफुटीसदृश पावसाचे मोठे संकट तूर्तास टळले आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मंगळवारी पहाटेपर्यंत नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. मंगळवारी सकाळी पावसाने नाशिक शहर परिसरात काही काळ विश्रांती घेतली असली तरी त्र्यंबकेश्वर,आणि इगतपुरी या परिसरात सध्या प्रचंड पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पालघरमध्ये मोठ्याप्रमाणावर पावसाला कारणीभूत असणारा भोवरा (Vortex) मंगळवारी नाशिक परिसरात सरकेल, असे भाकीत वर्तवले होते. मात्र, आता भोवरा वेगळ्याच दिशेने वळाल्याने नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

नाशिक त्र्यंबकेश्वरवरील ढगफुटीचा धोका टळला
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याच्या प्रवाहामुळे सोमवारी पालघरमध्ये तब्बल ४५० मिलिमीटर इतका मुसळधार पाऊस पडला होता. हाच भोवरा पुढे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या पट्ट्यात सरकण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे हे धोकादायक ढग आता नाशिक सोडून अहिल्यानगर (अहमदनगर) आणि गुजरातच्या सुरत शहराच्या दिशेने पुढे सरकले आहेत. त्यामुळे नाशिकवरील थेट ढगफुटीचा धोका आता टळला आहे.

ढगफुटीचा धोका टळला मात्र मुसळधार पाऊस कायम
दरम्यान, नाशिक, इगतपुरी त्रंबकेश्वर भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पावसाचा अंदाज कायम असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात किती मिलीमीटर पाऊस?
कळवण -४०
नांदगाव-१
सटाणा बागलाण – ४७
निफाड – ४५.२
सुरगाणा – १४९
सिन्नर – ७४
येवला – १५
दिंडोरी – ५८
पेठ – ६१
इगतपुरी – २००
पिंपळगाव बसवंत – ५१.५
देवळा – ४०
त्र्यंबकेश्वर – १२५

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

टिप्पर

Nashik Crime News: नाशकात लेडी ब्लॅकमेलरची दहशत; सीएला तब्बल १० लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधीआर्थिक फसवणूक व्यवहारातून आणि त्यानंतर पोलिसांत खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत सीए (चार्टर्ड अकाउंटंट) कडून लाखोंची खंडणी उकळणाऱ्या एका हायप्रोफाईल महिलेचा पराक्रम...