Friday, November 22, 2024
Homeनगर12 मतदारसंघांत मतदार यादीवर 39 हजार 231 दावे-हरकती

12 मतदारसंघांत मतदार यादीवर 39 हजार 231 दावे-हरकती

सर्वाधिक नगर शहर आणि नेवाशात आक्षेप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता तारखेवर आधारीत छायाचित्र मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांत मतदार याद्याबाबत हरकतींचा पाऊस पडला असून तब्बल 39 हजार 231 ऑनलाईन व ऑफलाईन दावे आणि हरकती आल्या आहेत. सर्वाधिक नगर शहर मतदार संघातील तब्बल 5 हजार 329 हरकती आल्या असून प्रशासन अंतिम निर्णय घेणार आहे.

- Advertisement -

दाखल दावे आणि हरकतींवर 18 वर्षे पूर्ण करणार्‍या मतदारांनी नाव नोंदणीसाठी 22 हजार 23 अर्ज (नमुना 6) आले आहेत. तर नावात बदल, पत्ता बदल करणे व स्थलांतर यासाठी नमुना 8 साठी 7 हजार 579 हरकती आल्या आहेत. मयत, दुबार, स्थलांतरित मतदारांची नावांची वगळणी करण्यासाठी 9 हजार 619 हरकती घेण्यात आल्या. जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 19 जुलै 2024 पर्यंत 36 लाख 73 हजार 969 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात 36 लाख 59 हजार 201 मतदार होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आक्षेप घेतलेल्या 19 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली होती. त्यातील 13 हजार मतदारांची नावे पुन्हा विधान सभेसाठीच्या मतदार यादीमध्ये आली आहेत.

निवडणूक आयोग जाहीर केलेल्या छायाचित्र मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमानुसार 6 ऑगस्ट 2024 रोजी एकत्रिकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली. 6 ते 20 ऑगस्ट दरम्यान दावे व हरकती घेण्यात आल्या. 29 ऑगस्ट रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. 29 ऑगस्ट, 2024 रोजी अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे तसेच डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यीची छपाई करण्यात आहे. 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम यादीची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

मतदारसंघनिहाय हरकती
अकोले 2 हजार 456, संगमनेर 3 हजार 154, शिर्डी 3 हजार 92, कोपरगाव 3 हजार 27, श्रीरामपूर 1 हजार 992, नेवासा 4 हजार 280, शेवगाव 3 हजार 787, राहुरी 3 हजार 347, पारनेर 2 हजार 79, अहमदनगर शहर 5 हजार 329, श्रीगोंदा 2 हजार 540, कर्जत-जामखेड 4 हजार 148 असे आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या