Sunday, September 15, 2024
Homeनगरमतदार यादीवर हरकती सादर करण्यास प्रारंभ

मतदार यादीवर हरकती सादर करण्यास प्रारंभ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक जानेवारी 2024 या अर्हता तारखेनुसार मतदार यादी तयार करण्यात आली आहे. यादीसंबंधी कोणाच्या काही हरकती असल्यास येत्या 3 ऑक्टोबरपर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांनुसार मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना त्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि निवडणूक नोंदणी अधिकार्‍यांकडे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी मतदार यादीमधील आपले नाव, पत्ता आणि फोटो बरोबर आहे का, याची खात्री करावी. विहित कालावधीनंतर हरकतींचा कोणताही विचार केला जाणार नाही, असे प्रशासनाच्यावतीने कळवण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या