Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून मतदार नोंदणी व पडताळणी

आजपासून मतदार नोंदणी व पडताळणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आगामी लोकसभा,विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.त्यानुसार निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2023 अंतर्गत शुक्रवार (दि.21) पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन मतदारांची नोंदणी व पडताळणी कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दि.1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण केले जाणार आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी निवडणूक तहसीलदार मंजुषा घाटगे उपस्थित होत्या. नवीन पात्र मतदारांची नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अंदाजित लोकसंख्या 63.35 लाख

सन 2023 सालची अंदाजित लोकसंख्या 63 लाख 35 हजार 858 आहे.जिल्ह्याची एकुण मतदार संख्या 46 लाख 30 हजार 375 आहे.यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 24 लाख 20 हजार 131 (52.27 टक्के) तर स्त्री मतदारांची संख्या 22 लाख 10 हजार 162 (47.73 टक्के) आहे.तृतीय पंथी मतदारांची संख्या 82 इतकी आहे. प्रती हजार पुरुषांच्या मागे स्त्री मतदारांचे प्रमाण हे 913 इतके आहे. एकुण दिव्यांग मतदारांची संख्या 19 हजार 499 (0.42 टक्के) तर पुरुष दिव्यांग मतदार 12 हजार 108 (62.10 टक्के)आहे. स्त्री दिव्यांग मतदार 7.391 (37.90 टक्के) आहे. 18 ते 19 या वयोगटातील मतदारांची संख्या 36 हजार 028 (0.78 टक्के) आहे.

जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्राची संख्या 4 हजार 724 इतकी आहे. त्यापैकी शहरी भागातील मतदान केंद्राची संख्या 1649 तर ग्रामीण भागातील मतदान केंद्राची संख्या 3075 आहे. मतदान केंद्र ठिकाणांची (ङेलरींळेप) संख्या- 4426 असून त्यात शहरी मतदान ठिकाणांची संख्या 1454, ग्रामीण मतदान ठिकांणाची संख्या 2972 आहे. एकूण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संख्या 4724 आहे.

नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक मतदार

जिल्ह्यात सर्वाधिक मतदार संख्या असलेला मतदार संघ नाशिक पश्चिम असून या मतदार संघामध्ये 4 लाख 31 हजार 675 मतदार आहेत.तर सर्वात कमी मतदार संख्या इगतपुरी मतदार संघात असून यामध्ये 2 लाख 65 हजार 285 मतदार आहेत.

पुनरिक्षण कार्यक्रमातील महत्वाचे टप्पे

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा मतदाराच्या घरोघरी भेट देऊन मतदाराची पडताळणी करणे दि.21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी दि.17 ऑक्टोंबर 2023 ला प्रसिद्ध केली जाईल.यावर दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.17 ऑक्टॉबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 असा आहे.मतदार यादी अंतिम प्रसिध्दी दि.5 जानेवारी 2024 करण्यात अयेणार आहे.

घरोघरी भेट देऊन पडताळणी

या अंतर्गत मतदाराच्या पडताळणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदाराच्या घरी जाऊन मतदाराच्या तपशीलाची पडताळणी बिएलओ अपद्वारे ऑनलाईन पध्दतीने करणार आहेत. यामध्ये मतदाराचे नांव, वय, लिंग, पत्ता, कुटुंबातील सदस्य यांची पडताळणी होणार आहे.मतदार दिलेल्या पत्त्यावर राहतो किंवा नाही, त्याचे स्थलातर झालेले आहे काय, मयत मतदाराची पडताळणी केली जाणार आहे. गृह भेटीच्या वेळी पात्र मतदारांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने केली जाईल. संभाव्य मतदाराचे नाव नोंदणी साठी फॉर्म भरुन घेतला जाईल. एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव नोंदणी असलेले, मयत मतदार कायम स्वरुपी स्थलांतरीत मतदार यांची पडताळणी केली जाणार आहे. मतदार यादीतील नोंदीची दुरुस्ती केली जाणार.मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडणी केली जाणार आहे, असेही मंगरूळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या