Saturday, September 26, 2026
Homeजळगावगुढे परिसरातील मतदारांची वैशालीताईंसोबत राहण्याची ग्वाही

गुढे परिसरातील मतदारांची वैशालीताईंसोबत राहण्याची ग्वाही

पाचोरा । प्रतिनिधी

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या प्रचाराला भडगाव तालुक्यातील गुढे तसेच परिसरातील गावांमध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येऊन या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही नागरिकांनी दिली आहे.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना वैशालीताई सूर्यवंशी यांच्या झंझावाती प्रचार फेर्‍यांनी सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागातील मतदारांना परिवर्तनाची साथ दिली असून त्यांच्या या आवाहनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. आज हेच चित्र तालुक्यातील गुढे तसेच परिसरातील गावांमध्ये दिसून आले.

गुढे गावात वैशालीताई सूर्यवंशी यांचे जोरदार जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मतदारसंघाच्या समग्र विकासासाठी यंदा परिवर्तन करा अशी साद त्यांनी उपस्थित नागरिकांना घालत या निवडणुकीत आपल्या पाठीशी उभे राहण्याची विनंती केली.

याला नागरिकांनी प्रतिसाद देत ताईंना विजयी करणार असा निर्धार याप्रसंगी व्यक्त केला. याप्रसंगी दीपक पाटील, डॉ.उत्तमराव महाजन, डॉ. संजय पाटील, पप्पू पाटील, राजू पाटील, गोरख पाटील, योजना पाटील, सतीश पाटील, तुकाराम महाजन, राजेंद्र पाटील, महेंद्र महाजन, अनिल पाटील, दिनेश बोरसे, गोकुळ पाटील, गोपाल महाजन, संजय महाजन, पांडुरंग पाटील, मनोहर डहाळे, चुडामन चौधरी, उत्तम पाटील, जगदीश पाटील, राकेश महाजन, महेंद्र मोरे, हर्षल महाजन यांच्यासह सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. दरम्यान या प्रचार फेरीत माजी सैनिक विजय नथू महाजन यांनी वैशालीताई सूर्यवंशी यांच्यावर विश्वास ठेवून सर्व सहकार्‍यांसह पक्ष प्रवेश केला.

ताज्या बातम्या

Nashik News : दुष्काळसदृश परिस्थितीतील शेतकऱ्यांना विविध सवलतींचा लाभ देण्यासाठी यंत्रणेने...

0
नाशिक | Nashik खरीप हंगाम-२०२६ मध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १० तालुक्यांत प्रथम कळ (Trigger-1) लागू करण्यात आला आहे....