Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजअ‍ॅड. ढिकले यांना मतदार पुन्हा संधी देणार

अ‍ॅड. ढिकले यांना मतदार पुन्हा संधी देणार

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

विधानसभेच्या नाशिक पूर्व मतदार संघामधून महायुतीचे उमेदवार अ‍ॅड.राहुल ढिकले यांनी काल प्रभाग दोन मधील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या त्यामुळे गेल्या पाच वर्षात विकास कामांच्या माध्यमातून मतदार त्यांना पुन्हा संधी देणार आहे.

- Advertisement -

महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. ढिकले गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने विकास कामांच्या माध्यमातून मतदारांच्या संपर्कात आहे. भाजप कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभाग निहाय ते नागरिकांची भेट घेत आहे. काल प्रभाग दोन मध्ये त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी माजी नगरसेवक सुरेश खेताडे, संतोष भोर, दिलीप निमसे, गणेश माळदे, रामभाऊ संधान, जालिंदर शिंदे, नामदेव शिंदे, अभय माळोदे, प्रभाकर मते, कैलास शिंदे, शुभम वाघ, तुषार डोमकावळे, साहिल पाटील, सार्थक पाटील, रमेश लभडे, प्रकाश लभडे, बाजीराव माळदे, मुन्ना कापडणीस, विशाल जाधव, कैलास महाले, सुभाष शिंदे, रवि धारबळे, विनोद ढिकले, शुभम ढिकले, निलेश म्हस्के, जाफर सय्यद, मंगेश भडांगे, करण शिंदे, रमेश लभडे, बाजीराव साठे, अर्जुन लभडे, हर्षल शिंदे, प्रणव भुसारे, रविसुर्य मगर, आदित्य देशमुख, संदीप लभडे, मयुर मते, प्रशांत बुवा, राजू म्हस्के, जिगर बागवान, सद्दाम सय्यद, अर्जुन माळोदे आदीसह प्रभागातील विविध ठिकाणचे मतदार बंधू व भगिनी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

भाजप शहर चिटणीस संतोष भोर म्हणाले की, सन 2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ढिकले यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली. यंदा मात्र पक्षाने पहिल्याच यादीत त्यांचे नाव जाहीर केल्याने पक्षानेच त्यांना कामाची पावती दिली. आता ढिकले यांनी पाच वर्षात केलेल्या कामांची पावती मतदारांकडून मिळणार आहे. गेल्या पाच वर्षातील जनसंपर्क, कामास कधीही नकार न देणारा, सांगितलेले काम पूर्णत्वास नेणारा आपला राहुल भाऊ अशी प्रतिमा जनमानसात निर्माण करणारे व बहिणीचे लाडके भाऊ म्हणून प्रसिद्ध झालेले अ‍ॅड. ढिकले यांचा विजय तर निश्चित आहेतच फक्त आता किती मताधिक्य मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल अशी अपेक्षा ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप निमसे यांनी व्यक्त केली. आमदार ढिकले हे सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचलित आहे. मागील निवडणुकीमध्ये मिळालेल्या संधीचं ढिकले यांनी सोने केले. म्हणून पक्षाने त्यांना पुन्हा संधी देऊन कामाची पावती दिली आहे. महायुती सरकारच्या कमी कालावधीमध्ये मोठी कामे झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आमदार ढिकले यांच्या प्रयत्नातून पन्नास कोटींचे दोन उड्डाणपूल होत आहे त्यामुळे येथील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आता ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी घेतले पुन्हा निवडून येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी नगरसेवक सुरेश खेताडे यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...