Monday, June 24, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वरमधील 'इतक्या' ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदानाला प्रारंभ

त्र्यंबकेश्वरमधील ‘इतक्या’ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदानाला प्रारंभ

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदानाला सुरवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात ४८ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदानाला प्रारंभ झाला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सकाळी मतदान प्रक्रियेला सुरवात झाली असून पहिल्या दोन तासांत सरासरी २० टक्के मतदान झाले आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये अतिशय अटीतटीचे वातावरण पहायला मिळत असून हरसूल ग्रामस्थांनी मतदान करायला सुरवात केली आहे. सकाळपासून ग्रामस्थांमध्ये मतदानासाठीचा उत्साह दिसून येत असून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव, मेटघर किल्ला, सोमनाथ नगर, महादेव नगर, विजय नगर यासोबतच, डाळेवाडी येथे पोटनिवडणुक होत असल्याने इथली निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता आहे. हरसूल वगळता, काही ग्रामपंचायतींचे काही वार्ड बिनविरोध झालेले आहे. मतदानादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदानाच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते संपत सकाळे व आमदार हिरामण आमदार खोस्कर ,तसेच विनायक माळेकर गोकुळ बत्तासे यांचे नेतृत्व या निवडणुकीत पणाला लागलेले असून उद्या मतमोजणीत काय होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या