Sunday, September 15, 2024
Homeनगरपत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांवर पाचट टाकावे : कोळेकर

पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांवर पाचट टाकावे : कोळेकर

राहाता |प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

उन्हाची तीव्रता (Intensity of Summer) मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांचे (Polling Station) आतील तापमान (Temperature) नियंत्रणात आणण्यासाठी अशा मतदान केंद्रांच्या छतावर 10 मे पूर्वी पाचट (Fodder) टाकण्यात यावे, अशा सूचना शिर्डी लोकसभा मतदार संघाचे (Shirdi Loksabha Voting Center) निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिल्या आहेत.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील (Shirdi Loksabha Voting Center) सहा विधानसभा मतदारसंघातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. शिर्डी मतदारसंघात अकोले (Akole), संगमनेर (Sangamner), शिर्डी (Shirdi), कोपरगाव (Kopargav), श्रीरामपूर (Shrirampur) व नेवासा (Newasa) या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यात एकूण 1708 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. सद्यस्थितीमध्ये उष्णतेची लाट आहे. त्यामुळे ज्या मतदान केंद्रांवर पत्र्याचे छत आहे. अशा केंद्रावर काम करणारे कर्मचारी तसेच मतदानासाठी येणार्‍या मतदारांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळून सुसह्य वाटावे तसेच व्हीव्हीपॅट मशिन (VVPAT Machine) अतिसंवेदनशील असल्याने वाढत्या तापमानामुळे या यंत्रात बिघाड होऊ नये याची दक्षता घेणेही गरजेचे आहे.

तेव्हा पत्र्याचे छत असलेल्या मतदान केंद्रांच्या आतील तापमान कमी करण्याच्या अनुषंगाने अशा छतांवर उसाचे पाचट, गवत, ज्वारी/ बाजरीचे तडस टाकण्याचे काम 10 मे पूर्वी करण्यात यावे. तसेच छतांवर टाकलेले पाचट, गवत, तडस जोराचा वारा आला तर उडून जावू नये, अशा तर्‍हेने पक्के बांधून ठेवण्याची दक्षता घ्यावी. विधानसभा मतदार संघातील सर्व तालुक्यांत ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, सेक्टर ऑफीसर यांनी संयुक्तपणे व समन्वयाने प्रथम प्राधान्याने तात्काळ आपल्या गावातील पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्राच्या छतावर उसाचे पाचट (Sugarcane Fodder), गवत (Grass), तडस टाकण्याचे काम मुदतीत पूर्ण करावे.

या सर्व कामांवर संनियंत्रण विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ठेवावे. याबाबत वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल उलट टपाली शिर्डी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास सादर करावा. सदर बाब ही निवडणुकीसंबंधी व अत्यंत महत्वाची असल्याने हयगय अथवा विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही श्री. कोळेकर यांनी दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या