मुंबई | Mumbai
सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून आज तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ९३ जागांसाठी मतदान पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून सकाळी सात वाजेपासून राज्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली आहे. नुकतीच सकाळपासून राज्यातील विविध मतदान केंद्रांवर सुरु झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.
यामध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी १०.५७ टक्के मतदान झाले होते. यात सांगलीत ५.८१, माढा ५.१५, सोलापूर ५.९७, रायगड ६.८४, लातूर ७.११, हातकानंगले ७.५५, कोल्हापूर ८.०४, बारामती ५.५७, उस्मानाबाद ५.७९, सातारा ७.०० रत्नागिरी-सिंधुदुर्ग ८.१७ टक्के मतदान झाले होते. यामध्ये दिग्गज नेत्यांनी आपआपल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान, याआधी १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील आणि २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. त्यानंतर आज (मंगळवार, ७ मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यामध्ये इंडिया आघाडी आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चुरस पाहायला मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून या टप्प्यात मतदान होणाऱ्या महाराष्ट्रातील काही मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.