Sunday, December 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजLoksabha Election 2024 : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळपासून सुरुवात

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदानास सकाळपासून सुरुवात

'या' नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई | Mumbai

सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून आज तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ९३ जागांसाठी मतदान पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून सकाळी सात वाजेपासून राज्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली आहे. नुकतीच सकाळपासून राज्यातील विविध मतदान केंद्रांवर सुरु झालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

- Advertisement -

यामध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी १०.५७ टक्के मतदान झाले होते. यात सांगलीत ५.८१, माढा ५.१५, सोलापूर ५.९७, रायगड ६.८४, लातूर ७.११, हातकानंगले ७.५५, कोल्हापूर ८.०४, बारामती ५.५७, उस्मानाबाद ५.७९, सातारा ७.०० रत्नागिरी-सिंधुदुर्ग ८.१७ टक्के मतदान झाले होते. यामध्ये दिग्गज नेत्यांनी आपआपल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी माळेगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला
बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर आपल्या सासुबाई आशाताई पवार यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनीत तटकरे यांनी सहकुटुंब मतदान केले
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

दरम्यान, याआधी १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील आणि २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. त्यानंतर आज (मंगळवार, ७ मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यामध्ये इंडिया आघाडी आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चुरस पाहायला मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून या टप्प्यात मतदान होणाऱ्या महाराष्ट्रातील काही मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या