नाशिक | प्रतिनिधी
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी संबंधित न्यायालयीन अपील तसेच उमेदवारी अर्ज भरताना मुदतींचे पालन न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांच्या सात प्रभागांतील निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये सिन्नर नगरपरिषदेचे चार, ओझर नगरपरिषदेचे दोन तसेच चांदवड नगरपरिषदेचा एक प्रभाग समाविष्ट आहे.
सिन्नर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २, ४, ५ व १०, ओझर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ व ८ आणि चांदवड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ येथील निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या होत्या. या प्रभागांसाठी स्वतंत्र व सुधारित निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी जाहीर करणार आला होता . त्या कार्यक्रमानुसार २० डिसेंबर रोजी मतदान, २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून, २३ डिसेंबरपूर्वी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
सिन्नर नगरपरिषद
प्रभाग २ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
प्रभाग ४ अ : अनुसूचित जाती (महिला)
प्रभाग ५ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग १० ब : सर्वसाधारण
ओझर नगरपरिषद
प्रभाग १ अ : अनुसूचित जाती
प्रभाग ८ ब : सर्वसाधारण
चांदवड नगरपरिषद
प्रभाग ३ अ : नागरिकांचा मागास प्रवर्ग




