Saturday, May 4, 2024
Homeनगरआप्पासाहेब राजळे यांच्याकडे संचालक निवडीचे अधिकार

आप्पासाहेब राजळे यांच्याकडे संचालक निवडीचे अधिकार

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) –

प्रतीदिन आठशे मेट्रिक टनावरून अडीच हजार मेट्रिक टन प्रतीदिन गाळप क्षमतेत वृद्धेश्वरचे विस्तारीकरण झाले. इथेनॉल प्रकल्पालाही केंद्र

- Advertisement -

शासनाने मान्यता दिली. राज्यात सहकारी साखर कारखाने अवसायनात निघत असताना वृद्धेश्वर सुस्थितीत आहे. संस्थेच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, असा सार्वत्रिक सूर शनिवारी पाथर्डी येथे घेण्यात आलेल्या कारखान्याच्या निवडणूक विचारविनिमय सभेत निघाला.

बिनविरोधचे संचालक निवडीचे सर्व अधिकार ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे यांच्याकडे राहतील, असा महत्त्वपूर्ण ठरावही प्रसंगी उपस्थित असलेल्या ऊसउत्पादक शेतकरी सभासदांच्यावतीने हात उंचावून करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब राजळे होते. आ. मोनिका राजळे, भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, चंद्रकांत म्हस्के, गहिनीनाथ थोरे, अर्जुनराव शिरसाठ, तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे, सुरेश आव्हाड, जिल्हा परीषद सदस्य राहुल राजळे, रामकृष्ण महाराज कराळे व्यासपीठावर होते.

खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब अकोलकर, उद्धवराव वाघ, शिरसाठ आदींनी कारखान्याच्या स्थापनेपासुनच्या वाटचालीचा आढावा सांगितला. सरपंच काशिनाथ लवांडे यांनी विरोधासाठी विरोध ही भूमिका सहकारी संस्थांच्या राजकारणात योग्य नसल्याचे सांगत बिनविरोध भुमिकेला सार्वत्रिक समर्थन मिळावे, असे आवाहन केले. चेअरमन राजळे यांनी कारखाना प्रगतीचा आढावा सांगत सहकाराची खरी व्याख्या विषद केली. प्रास्ताविक हिंद्कुमार औटी यांनी केले. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी आभार मानले. विष्णूपंत अकोलकर, वैभव आंधळे, विष्णुदास भोरडे,पोपटराव कराळे, पुरुषोत्तम आठरे आदींसह ऊसउत्पादक शेतकरी सभासद प्रसंगी हजर होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या