Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकनाशकात ‘वृक्ष उत्सव-2023’चे आयोजन

नाशकात ‘वृक्ष उत्सव-2023’चे आयोजन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका व हिरवांकुर यांच्या संयुक्त विद्यमानाने महापालिका नाशिक शहरामध्ये पहिल्यांदाच ‘वृक्ष उत्सव 2023’ चे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेचे भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृह येथे दि. 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रदर्शन भरविण्यात येत आहे. मनपाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने प्रदर्शनाची तयारी सुरू आहे. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या देशी झाडांची माहिती देण्यात येणार आहे. प्रदर्शनामुळे पर्यावरण व वृक्षांविषयी जनजागृती निर्माण होऊन आपले शहर स्वच्छ, सुंदर बनविण्यास देखील हातभार लागणार आहे.

त्याअनुषंगाने विविध पर्यावरणपूरक, नावीन्यपूर्ण उपक्रम, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्लास्टिक प्रदूषणमुक्त शहर करण्यासाठी विविध उपक्रम याठिकाणी घेण्यात येणार आहेत. तसेच कंपोस्टिंग, रेनवॉटर हार्वेंस्टींग, विविध प्रकारच्या वृक्षांच्या प्रजातीची,वृक्षांची माहिती व त्यांचे उपयोग याबाबत देखील माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिककरांना मिळण्यास मदत होणार आहे.

प्रदर्शनात विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित व 4 ऑगस्टपासून सुरु होणार्‍या ‘वृक्ष उत्सव 2023’ या देशी झाडे व रोपे यांच्या प्रदर्शनास पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तसेच नाशिककरांनी भेट देण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या पर्यावरण संवर्धन विभागाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या