Friday, February 6, 2026
Homeनगरट्रॅक्टर कॅनॉलमध्ये उलटून चालकाचा मृत्यू

ट्रॅक्टर कॅनॉलमध्ये उलटून चालकाचा मृत्यू

वडाळा महादेव |वार्ताहर|Wadala Mahadev

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील वडाळा महादेव (Wadala Mahadev) शिवारामध्ये काल ट्रॅक्टर कॅनॉलमध्ये उलटल्याने ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू (Death) झाला. संदीप दत्तात्रय आहेर (वय 22, रा. भोकर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल सकाळी 10 वाजता वडाळा महादेव येथील मनोज बाळासाहेब गवळी यांचा ट्रॅक्टर (Tractor) घेऊन संदीप आहेर हा तरुण जात असताना त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर घसरून कॅनॉलच्या पाण्यात उलटला.

- Advertisement -

त्यामुळे चाके वरती तर चालक संदीप आहेर खाली पाण्यामध्ये पडल्याने जखमी झाला. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टर मालकांना दिली. तसेच जमलेल्या नागरिकांनी मदतकार्य सुरू करून जखमी आहेर यांना बाहेर काढून उपचारासाठी कामगार हॉस्पिटल याठिकाणी दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच संदीप आहेर यांचा मृत्यू (Death) झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. मयत संदीप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...