अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर शहराचे वैभव असलेल्या वाडिया पार्क क्रीडा संकुलाचे (Wadia Park Sports Complex) रुपडे पालटण्याची चिन्हे आहेत. आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्या पाठपुराव्याने या क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी 51 कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यातील पहिल्या टप्प्याच्या 15 कोटी 69 लाख 52 हजार रुपये निधीतून संकुलाच्या मैदानात 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, क्रिकेट ग्राउंड लॉन, मैदानाच्या देखभालीसाठी स्प्रिंकलर सिस्टीम तसेच कबड्डी, खो खो, बास्केट बॉल व व्हॉलिबॉल मैदानांचे डोम रूफ, ग्राउंड आदी क्रीडा सुविधांचा (Sports Facilities) समावेश आहे.
नगर शहरातील वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुलात खेळाची मैदाने तयार करणे, दुरुस्ती करणे, इनडोअर गेमच्या हॉलची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने 51 कोटी 17 लाख 25 हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यातील 15 कोटी 69 लाख 52 हजार रुपयांच्या निधीला (Fund) प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दुसर्या टप्प्यात 35 कोटी 47 लाख 73 हजार रुपयांच्या निधी मिळणार मिळणार आहे. या निधीमुळे जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे पालटणार आहे. याबाबत आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन क्रीडा व युवक सेवा संचालनालय विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी
या संदर्भात परिपत्रक काढले आहे. पहिल्या टप्प्यातील क्रीडा सुविधा झाल्यावर दुसर्या टप्प्यामध्ये 35 कोटी 47 लाख 73 हजार रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये स्टेडियमधील प्रेक्षक गॅलरीस रुफिंग करणे, स्वच्छतागृह दुरुस्ती, रेनवॉटर, बॅडमिंटन हॉल अद्ययावतीकरण व वुडन फ्लोरिंग, स्वच्छतागृह, सोना व स्टीम बाथ व्यवस्था, ऑकेस्टिक व्यवस्था, वसतिगृहाचे दुसरा मजला बांधकाम, पेव्हर ब्लॉक संपूर्ण इमारत, रुममधील अंतर्गत कामे, जलतरण तलाव अद्ययावतीकरण, फिल्ट्ररेशन प्लान्ट दुरुस्ती, वेट जीम ट्रेनिंग हॉल, स्वच्छतागृह, अंतर्गत व बाह्य रंगरंगोटी, पार्किंग एरियामध्ये पेव्हर ब्लॉक, टू व फोर व्हिलर पार्किंग शेड, स्वागत कक्ष अंतर्गत कामे, कुस्ती व बॉसिंग हॉल बांधकाम, कुस्ती तालीम अद्ययावतीकरण व नवनिर्मिती, दुमजली बांधकाम व तळमजला कुस्ती हौद, पहिला मजला कुस्ती मॅट हॉल, दुसरा मजला बॉसिंग हॉल, कबड्डी व खोखो मैदानांचे अद्ययावतीकरण, डोम रूफ व स्वच्छतागृह बांधकाम, दोन सिंथेटिक टेनिस कोर्ट, सीसी रोड, एन वॉटर गटार व्यवस्था, विद्युतीकरण अंतर्गत व बाह्य, ड्रेनेजलाइन व्यवस्था, पाणीलाइन व्यवस्था, रुफ टॉप सोलन पॅनल व्यवस्था, स्टेडियम, बॅडमिंटन हॉल, वसतिगृह, जलतरण तलाव, कुस्ती हॉल आदींचा समावेश आहे.
नगरमध्ये भव्य जिल्हा क्रीडा संकुल (District Sports Complex) उभारण्यात आले आहे. परंतु तेथे पुरेशा सुविधा नाहीत. क्रीडा प्रेमी व विविध संघटनांनी आमदार जगताप यांच्याकडे सुविधा देण्यासाठी मागणी केली होती. त्याची दखल घेत आमदार जगताप यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या मागणीला यश आले असून पहिल्या व दुसर्या टप्प्यातील निधी मिळाल्यानंतर येथील सर्वांगीण क्रीडा विकासाची कामे होणार असून, यामुळे जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे पालटणार आहे.