Thursday, May 23, 2024
Homeदेश विदेश‘वाघ बकरी टी’ समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे ४९व्या वर्षी निधन;...

‘वाघ बकरी टी’ समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे ४९व्या वर्षी निधन; भटक्या कुत्र्यांनी केला होता हल्ला

मुंबई | Mumbai

वाघ बकरी चहा (Wagh Bakri Tea) ब्रँडसाठी प्रसिद्ध गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचं निधन झाले आहे. फार कमी वयात मोठ्या उद्योजकाच्या निधनामुळे सर्वच स्थरांतून हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

प्राप्त माहितीनुसार, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचवताना ते पडले व त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर ते दवाखान्यात दाखल होते. उपचारा दरम्यान त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले. मात्र हे सर्व प्रयत्न फेल ठरले आणि उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

इस्रायलकडून गाझा भागात पुन्हा एकदा एअरस्ट्राईक; शेकडो नागरिकांचा मृत्यू

पराग हे देसाई कुटुंबातील चौथ्या पिढीतील सदस्य होते. नारनदास देसाई यांनी १८९२ मध्ये स्थापन केलेल्या कंपनीचा कारभार ते मागील काही वर्षांपासून पाहत होते. पराग देसाई (Parag Desai) गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड (Gujarat Tea Processors & Packers Ltd.) मध्ये कार्यकारी संचालक (Executive Director) पदावर कार्यरत होते.

पराग यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड युनिव्हर्सिटीमधील एमबीए पदवी शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी वाघ बकरी चहाची विक्री, वितरण आणि निर्यात यामध्ये मोलाची भूमिका बजावत ब्रँडला आणखी उंचीवर नेलं. पराग देसाई यांना वन्यजीवन आणि फिरण्याची आवड होती.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने संपवलं जीवन

साल १८९२ मध्ये ही कंपनी सुरू करण्यात आली होती. जळपास ५० दशलक्ष किलो या चाहापावडरचे वितरण होत आहे. गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांत वाघ बकरीला विशेष पसंती आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या