Saturday, May 25, 2024
HomeUncategorizedकरोनामुळे वाघ कॉलेज - जत्रा उड्डाण पुलाचा मुहुर्त लांबणीवर

करोनामुळे वाघ कॉलेज – जत्रा उड्डाण पुलाचा मुहुर्त लांबणीवर

नाशिक । Nashik

राज्यातील कॉग्रेस आघाडीच्या कारकिर्दीत झालेल्या गरवारे ते मीनाताई ठाकरे स्टेडीयम पर्यतच्या उड्डाणपुलाच्या काही अंतरानंतर के. के. वाघ अभियांत्रिकी कॉलेज ते हॉटेल जत्रा पर्यत नवीन होत असलेल्या उड्डाण पुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त करोनामुळे आता लांबणीवर पडला आहे. करोनामुळे मार्च ते जुन या काळात काम बंद झाल्याने ठेकेदार कंपनीला मुदतवाढ मिळाली असुन आता हे काम आता येत्या मे २०२१ पर्यत पुर्ण होणार आहे. तरीही आता या कामास ठेकेदार कंपनीकडुन वेग देण्यात आला आहे. (सर्व फोटो : सतीश देवगिरे )

- Advertisment -

ताज्या बातम्या