Wednesday, October 30, 2024
Homeनगरवळदगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

वळदगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील वळदगाव येथील धुमाळ वस्ती, गारडे वस्ती, बनकर वस्ती, आगरकर वस्ती शेख वस्ती परिसरात परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून ग्रामस्थांची झोप उडाली आहे. जंगलात संचार करणारे बिबटे गेल्या काही वर्षापासून नागरी वस्तीत येऊन जनावरे व माणसांना लक्ष्य करत असून रविवारी येथील सागर सुधाकर आगरकर हे रात्री मोटारसायकलवर त्यांच्या शेतातून घरी चाललेले असता बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

- Advertisement -

मात्र, त्यात ते थोडक्यात बचावले. वन विभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन हिम्मतराव धुमाळ, अण्णासाहेब गराडे, पोलीस पाटील शिवाजी भोसले, सुधाकर आगरकर इब्राहिम शेख यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या